Case Toh Banta Hai: ट्रेलर बघून खळखळून हसाल,रितेशचे विनोदी प्रश्न आणि फूल मनोरंजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Case Toh Banta Hai Trailer out

Case Toh Banta Hai: ट्रेलर बघून खळखळून हसाल,रितेशचे विनोदी प्रश्न आणि फूल मनोरंजन

रजत शर्माचा आप की अदालत हा शो तुम्ही सगळ्यांनीच बघितला असेल. अभिनेता रितेश देशमुख असाच एक शो पण हटके अंदाजात तुमच्यासाठी घेऊन येतोय. या शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या शो मध्ये तुम्हाला सेलिब्रिटींची फूल धमाल बघायला मिळणार आहे. परत एकदा तुम्हा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास रितेश देशमुख घेऊन येतोय एक कॉमेडी शो.ज्याचे नाव आहे केस तो बनता आहे. या मजेदार शो मध्ये तुम्हाला अनेक बॉलीवुड हस्ती बघायला मिळतील.

या शो मध्ये तुम्हाला फूल कॉमेडी बघायला मिळणार आहे. नुकताच या शोचा ट्रेलर रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला देखील टाकलाय. या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप तर होतील पण तेही विनोदी. ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा पहिलाच कॉमेडी शो आहे.

'केस तो बनता है' हा एक कॉमेडी शो आहे. यात अनेक सेलिब्रिटींना कठळ्यात उभे करत विनोदी प्रश्न विचारण्यात येणार आहे. शोच्या ट्रेलरमध्ये करण जोहर, करिना कपूर, रोहित शेट्टी, वरूण धवन, सारा अली खान हे सेलिब्रिटी दिसत आहेत. वकील बनलेल्या रितेश देशमुखच्या प्रश्नांची उत्तर यावेळी सेलिब्रिटीज देणार आहेत. या कॉमेडी शोच्या प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

'केस तो बनता है' हा कॉमेडी शो साप्ताहिक असणार आहे. रितेश देशमुख या शोमध्ये वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला या शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. हा शो प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमवर बघायला मिळणार आहे. अॅमेझॉनच्या मिनी टीव्हिवर हा शो लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Case Toh Banta Hai Comedy Show Trailer Out On Amazon Minitv Ritesh Deshmukh Will Be Advocate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..