मुंबईत गायक मिका सिंगच्या घरी चोरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जुलै 2018

गायक मिका सिंगच्या ओशीवरा येथील फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. यामध्ये दोन लाख रुपयांचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड होती. यासंबधी पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांना मिकाचा मित्र अंकित वासन यावर संशय आहे. 

मुंबई - गायक मिका सिंगच्या ओशीवरा येथील फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. यामध्ये दोन लाख रुपयांचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड होती. यासंबधी पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांना मिकाचा मित्र अंकित वासन यावर संशय आहे. 

मिका ज्या इमारतीत राहत होता त्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार ही चोरी काल (ता. 30) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान झाली. यावेळी, मिकाच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचीच चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

प्रमुख संशयित आरोपी अंकित वासन हा 27 वर्षांचा असून तो मिकाचे कॉन्सर्ट आयोजन करण्याचे काम करत असायचा. दहा वर्षांपासून मिका आणि अंकित एकामेकांचे चांगले मित्र आहेत. अंकितचे मिकाच्या घरी नेहमीच येणे-जाणे असायचे. शनिवारी चोरी झाल्यापासून अंकित फरार असून, त्याच्याशी कोणत्याच प्रकारे संपर्क होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चोरी झाली तेंव्हा मिका सिंग मात्र मुंबईत नव्हता.

Web Title: Cash Gold Worth Rs 3 Lakh Stolen From Singer Mika Singhs Mumbai Home