Taarak Mehta: सेटवर कलाकारांसोबत.. 'तारक मेहता'च्या कास्ट क्रू नेही केला धक्कादायक खुलासा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cast crew said Toxic work environment, sexism and harassment treatment on Taarak Mehta Ka Ooltah Chashmah set

Taarak Mehta: सेटवर कलाकारांसोबत.. 'तारक मेहता'च्या कास्ट क्रू नेही केला धक्कादायक खुलासा..

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: सर्वाधिक लोकप्रिय मालिकेचं बिरुद मिरवणारी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका आता चांगलीच गोत्यात आली आहे. गेली काही दिवस या मालिकेला लागलेली घरघर काही थांबता थांबेना.

या मालिकेच्या निर्मात्यांवर आता सडकून आरोप होत आहेत. मालिकेत रोशन भाभी ही व्यक्तिरेखा सादर करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालानं काही दिवसांपूर्वीच निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. 

त्यानंतर प्रिया आहुजा, मोनिका भादोरिया यांनीही निर्मात्यांकडून शोषण झाल्याचे उघड केले. याला काही दिवस उलटत असतानाच मालिकेटतून बाहेर पडलेल्या कास्ट क्रू मेंबर्सनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

(Cast crew said Toxic work environment, sexism and harassment treatment on Taarak Mehta Ka Ooltah Chashmah set)

'तारक मेहता' (taarak mehta ka ooltah chashmah) मालिकेच्या सेटवरचं वातावरण अतिशय वाईट, दूषित आणि मानसिक त्रास देणारं असल्याचा गंभीर आरोप आता काही कलाकारांनी केला आहे. त्यामुळे निर्माते असितकुमार मोदी यांची यांच्या अडचणीत अधिकच वाढ होईल असं दिसत आहे.

निर्मात्यांच्या अत्यंत कठोर नियमांमुळे सेटवरचं वातावरण अत्यंत वाईट असल्याचं सांगितलं जात आहे. मालिकेत 'रिटा रीपोर्टर' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा हिनं काही वर्षांपू्र्वी सांगितल की जेव्हा तिचा पती आणि 'तारक मेहता' मालिकेचा दिग्दर्शक मालवद राजदा या ही मालिका सोडली, तेव्हा सेटवरचं वातावरण लगेचच बदललं. तिला काम करायची इच्छा असूनही तिला मुद्दाम डावललं गेलं.

प्रिया म्हणाली की, माझ्याशी कुणी वाईट वागलं नाही किंवा माझा छळ केला नाही. पण तिथे अशा काही गोष्टी होत्या की जय सहन कारण्या पलीकडच्या होत्या.

तर शैलेश लोढा आणि राज अनादकट त्यांनाही 'तारक मेहता' वगळता दुसरीकडे कुठेच काम करण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे त्यांनीही कार्यक्रमाला रामराम केला.

शैलेशला त्याचे कवितांचे कार्यक्रम करायचे होते तर राजला एका म्युझिकल व्हिडिओत तसंच एका रिअॅलिटी कार्यक्रमात काम करायची संधी मिळाली होती. तर 'बाबीता' ही भूमिका सकरणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिनं देखील या कार्यक्रमाच्या निर्मात्यांच्या जाचक नियमांविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे

मालिकेतून बाहेर पडलेल्या एका कलाकारानं सांगितलं की, दिशा वकानी बाहेर पडल्यानंतर मालिकेला मोठा फटका बसला. कार्यक्रमाच्या सेटवर दबावाचं वातावरण होतं. अशा तणावपूर्ण वातावरणात चांगलं काम करण्याची अपेक्षा केली जात होती. त्यामुळे हा तणाव अधिकच वाढला होता. सेटवर कायम राजकारण केलं जायचं.


कार्यक्रमाचे आधीचे दिग्दर्शक मालव राजदा हे देखील कार्यक्रमातून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यानी सांगितलं की ते जे काही काम करत होते त्यातून त्यांना समाधान मिळत नव्हतं. मात्र प्रत्यक्षात त्यांचंही निर्मात्यांशी जमत नव्हतं. दिग्दर्शक म्हणून त्यांना निर्मात्यांशी बोलताच येत नव्हतंन म्हणून तेही या मालिकेतून बाहेर पडले.