सेलिब्रेटींकडून 'अशी' केली जातेय कोरोनाबाबत जनजागृती!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

- जगभरात कोरोनाने घातलेय थैमान.

- सेलिब्रेटींकडून केली जातेय याबाबत जनजागृती.

मुंबई : सध्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पाहायला मिळते आहे. अनेक सेलिब्रेटीही कोरोनाची जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत पुढे येत आहेत. यातच आता सोशल मीडियावर मराठी चित्रपटांच्या नावाचा वापर करून जनजागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हॅशटॅग गो कोरोना आणि टिकटॉकच्या व्हिडिओनंतर आता हे पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसत आहेत आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी कशाप्रकारची काळजी घेतली पाहिजे याचे संदेश दिले आहेत.

JUNKIES

लोकांना घरीच थांबवण्याचे, स्वतःला स्वच्छ ठेवण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आवाहन या पोस्टमधून करण्यात आले आहे. "ती सध्या काय करते...' वर्क फ्रॉम होम', "नेहमी हात धुवा, स्वच्छता राखा, काळजी घ्या आणि "टकाटक' राहा', "स्वतःची काळजी घ्या "भयभीत' होऊ नका'.

Corona

 "सध्या हॉस्पिटलमध्ये 24 तास आपल्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक "हिरकणी'ला मानाचा मुजरा', "जो काय "टाईमपास' करायचा आहे तो घरी बसून करा', "विनाकारण "प्रवास' करणं टाळा', "टपरीवर नको आता घरीच "खारी बिस्किट' खा', "सध्या सगळं जग "व्हेंलिलेटर'वर आहे'.

Image may contain: text

"मुंबई-पुणे-मुंबई' काही दिवस प्रवास नाही केला तरी चालेल' अशा पोस्टला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrities started awareness about Coronavirus