esakal | सेलिब्रेटी बाप्पा! यंदा मूर्ती छोटी, पण उत्साह मोठा - विद्या माळवदे
sakal

बोलून बातमी शोधा

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा मूर्ती छोटी, पण उत्साह मोठा - विद्या माळवदे

अभिनेत्री विद्या माळवदे हिच्या घरी सात दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सव धूमधडाक्‍यात केला काय किंवा साध्या पद्धतीने केला काय, शेवटी श्रद्धा महत्त्वाची, असे ती म्हणते... 

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा मूर्ती छोटी, पण उत्साह मोठा - विद्या माळवदे

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

अभिनेत्री विद्या माळवदे हिच्या घरी सात दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सव धूमधडाक्‍यात केला काय किंवा साध्या पद्धतीने केला काय, शेवटी श्रद्धा महत्त्वाची, असे ती म्हणते... 
 

गणेशोत्सव म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन खेळीमेळीने आणि आनंदाने साजरा करायचा सण. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पा विराजमान होतात. गणपतीच्या दिवसांमध्ये संपूर्ण वातावरण कसे भक्तिमय झालेले असते; मात्र यंदा उत्सवाचे स्वरूप काहीसे मर्यादित असेल आणि त्याला कारण आहे कोरोना... आपले आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारी नियम पाळूनच आम्ही गणेशोत्सव साजरा करणार आहोत, पण आमची भक्ती किंवा श्रद्धा अजिबात कमी झालेली आहे. आमची बाप्पावर खूप श्रद्धा आहे आणि ती कायमच राहील. 

सेलिब्रेटी बाप्पा! शेवटी आपली भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची... - शंकर महादेवन

आमच्या घरी दरवर्षी सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. सात दिवस गोडधोड पदार्थांची रेलचेल आणि मित्रमंडळी, नातेवाईक आणि इमारतीतील रहिवाशांची वर्दळ असते. भेटीगाठी होतात. दरवर्षी आम्ही दोन ते अडीच फुटांची मूर्ती आणतो; मात्र यंदा दोन फुटांपेक्षा कमी उंचीची मूर्ती आणणार आहोत. मास्क घालून आणि सुरक्षित अंतराचे पालन करूनच मूर्ती घरी आणू. यंदाच्या वर्षी आरतीसाठीही फारशी मंडळी नसतील. प्रसाद बनवणारच आहोत, पण त्याचे प्रमाण कमी असेल. कोरोना संकटामुळे आमच्या इमारतीत फारशी कुणाला एण्ट्री नाही. त्यामुळे आम्हीही फारसे कुणाला निमंत्रण देणार नाही. माझी मावशी आणि जवळचे आठ-दहा नातेवाईकच असतील. बाकी मित्रमंडळी आणि इमारतीतील रहिवाशांना मात्र यंदा बोलावणे टाळणार आहोत. 

सेलिब्रेटी बाप्पा! मंगेशकर कुटूंबियांना विघ्नहर्त्यांच्या आगमनाची उत्सुकता...

भक्ती महत्त्वाची! 
बाप्पाचे आगमन आणि विसर्जन सरकारी नियमानुसारच करणार आहोत. सरकारने आपल्या प्रार्थनेवर किंवा भक्तीवर काही बंधन घातलेले नाही. गणेशोत्सव धूमधडाक्‍यात केला काय आणि साध्या पद्धतीने केला काय... शेवटी आपली श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची. गणेशोत्सव साजरा करा, पण सरकारी नियमावलीनुसारच. आताची परिस्थिती बिकट असल्याने आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. 
-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top