सेलिब्रिटी शेफचा किचनमध्ये आढळला मृतदेह !

वृत्तसंस्था
बुधवार, 25 डिसेंबर 2019

प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘जॅगीज कूकबुक’ या लोकप्रिय कुकरी शोमुळे जगी लाइमलाइटमध्ये आली होती. तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत. 

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘जॅगीज कूकबुक’ या लोकप्रिय कुकरी शोमुळे जगी लाइमलाइटमध्ये आली होती. तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#rosecollections #indianlady #indiansaree #yellowlove #yellowlover #yellowsaree

A post shared by Jagee John (@jageejohn) on

जगीच्या राहत्या घरातील किचनमध्येच ती मृतावस्थेत सापडली. जगीच्या मृत्युचं गूढ उकलण्यात यश आलेले नाही. जगी जॉन केरळमधील कुवर्णकोनमध्ये तिच्या आईसोबत राहत होती. जगीचा मृतदेह शेजाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली आणि झालेला प्रकार उघडकीस आला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jagee John (@jageejohn) on

जगीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम, मार किंवा व्रण आढळले ऩाहीत. त्यामुळे मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल.

जगी सोशल मीडियावर लोकप्रिय होती आणि अॅक्टीवदेखील होती.  शेवटची सोशल मीडिया पोस्ट तिने रविवारी केली होती. जगी जॉन 45 वर्षांची होती. सौदी अरेबियात तिचा जन्म झाला आणि इंग्लंड, युएसए आणि भारतामध्ये तिचं शिक्षण झालं आहे. ब्युटी शो यांतून ती जज म्हणून झळकली आहे. शिवाय गायक, मॉडेल, होस्ट अशीही तिची ओळख होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity chief jagee john death