सेलिब्रिटी बाइकर चेतना पंडित यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

गोरेगाव येथील डिंडौसा स्थित फ्लॅटमध्ये 27 वर्षीय चेतना पंडित या तीन मैत्रीणींसोबत राहत होत्या. फ्लॅटमध्ये कुणीही नसताना त्यांनी स्वतःला गळफास लावत आयुष्य संपवले.

मुंबई - बॉलिवूड तारकांना मोटारसायकल शिकवणाऱ्या महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी (ता. 9) रात्री त्यांनी हे पाऊल उचललं. 

बॉयफ्रेण्डसोबत ब्रेकअप झाल्याने नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचं समजतं. गोरेगाव येथील डिंडौसा स्थित फ्लॅटमध्ये 27 वर्षीय चेतना या तीन मैत्रीणींसोबत राहत होत्या. फ्लॅटमध्ये कुणीही नसताना त्यांनी स्वतःला गळफास लावत आयुष्य संपवले. त्यांच्या मैत्रीणी घरी परतल्या असता चेतना दार उघडत नाही म्हणून मैत्रीणींनी त्यांना मोबाईलवर कॉल केला. पण कॉल संपर्क क्षेत्राच्या बाहेर येत होता. शेवटी मैत्रीणींनी चावीवाल्याच्या सहाय्याने दार उघडले असता चेतनाने स्वतःला संपवल्याचे समोर आले. ज्यानंतर चेतना यांच्या मैत्रीणींनी पोलिसांना कळवले. 
 

Chetna Pandit

चेतना यांनी त्यांच्या खोलीत सुसाइड नोट लिहीली होती. ज्यात, 'भावाची माफी मागत नैराश्येतून मी आत्महत्या करत आहे.' असे लिहीले आहे. चेतना नागेश पंडित कर्नाटकातील शिमोगा येथील मुळ रहिवासी होत्या. मुंबईत त्या खुप वर्षापासून राहत होत्या. महिलांना मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण त्या देत होत्या. चेतना यांनी 'धूम 3' साठी कॉटरीना कैफ, 'जब तक है जान' साठी अनुष्का शर्मा, 'एक विलेन' साठी श्रध्दा कपूर आणि माधुरी दिक्षित यांना बाइक रायडिंगचे प्रशिक्षण दिले आहे.   

Chetna Pandit

Chetna Pandit


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Motorcycle Coach Chetna Nagesh Pandit Commits Suicide