सेलिब्रिटी विकएण्ड : मैत्रिणींबरोबर गप्पांचे फड! 

सायली संजीव, अभिनेत्री 
Saturday, 6 June 2020

मराठीतील सर्वाधिक बिझी अभिनेत्री म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं. तिला तिच्या तिच्या विकएण्डबद्दल विचारलं असता ती म्हणाली, की शनिवार आणि रविवार या दोन दिवशी खूप काम करावं लागतं. 

‘काहे दिया परदेस’ या मालिकेद्वारे सायली संजीवला खूप लोकप्रियता मिळाली. टीव्ही मालिका, चित्रपट तसेच नाटकांमध्ये तिनं काम केलं. लॉकडाउन होण्यापूर्वी एक दिवस अगोदर तिचा ‘एबी आणि सीडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या तिच्याकडं अनेक मराठी चित्रपट आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठीतील सर्वाधिक बिझी अभिनेत्री म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं. तिला तिच्या तिच्या विकएण्डबद्दल विचारलं असता ती म्हणाली, की शनिवार आणि रविवार या दोन दिवशी खूप काम करावं लागतं. इकडं शूटिंग. तिकडं डबिंग, तसेच नाटक असा माझा संपूर्ण विकएण्ड बिझी आणि बिझी असतो कामामध्ये. खरंतर आम्हाला इतरांप्रमाणं विकएण्ड असा नसतोच, पण कधी शूटिंग नसले की मजा करते. चित्रपट पाहणं, मैत्रिणींबरोबर फिरायला जाणं असा माझा बेत असतो. आम्ही मैत्रिणी भेटलो की पत्ते खेळणं, ल्युडो- गेम खेळणं वगैरे होतं. माझ्या क्षेत्रातील मैत्रिणी भेटल्यावर नाटक आणि चित्रपट यांवर आमच्या गप्पा रंगतात आणि अन् इतर मैत्रिणी भेटल्यावर इतर अवांतर विषयांवर गप्पा रंगतात. माझी एक वकील मैत्रीण आहे, ती भेटल्यावर कोर्टात कशा प्रकारच्या केसेस येतात यांवर गप्पा रंगतात, तर ऋतुजा बागवे ही माझी मैत्रीण भेटल्यावर नाटकांवर चर्चा होते. ‘अनन्या’ या नाटकात तिनं कशी भूमिका साकारली, मेहनत कशी घेतली यावर आम्ही भरभरून बोलतो. मला सुट्टी असल्यावर मी अधिक वेळ मैत्रिणींना देते.

माझा वीकएण्ड शनिवार आणि रविवार सोडून असतो. वाचनाची मला फार आवड नाही, पण वेळ मिळेल तेव्हा मी वाचन करते. बातम्या पाहते आणि टीव्ही बघते. शॉपिंग मात्र मी ऑनलाईन करण्यालाच प्राधान्य देते. मी मॉलसारख्या ठिकाणी जात नाही. सुटीच्या दिवशी घरी अधिक वेळ घालवायला मला आवडतो. सकाळी आरामात उठणं, स्वतः चहा करणं, आपल्या आवडीचा एखादा पदार्थ बनवणं आणि खाणं असा बेत असतो. मी माझा प्रत्येक दिवस वीकएण्ड म्हणूनच सेलिब्रेट करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Weekend Article Sayali Sanjeev actress Chat with friends