esakal | ब्रेकिंग- सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला
sakal

बोलून बातमी शोधा

sushant CBI

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची मोठी अपडेट आता समोर येत आहे. सुशांतच्या मृत्युच्या तपासासाठी केंद्राकडून सीबीआय तपासासाठी मंजूरी दिली आहे.

ब्रेकिंग- सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची मोठी अपडेट आता समोर येत आहे. सुशांतच्या मृत्युच्या तपासासाठी केंद्राकडून सीबीआय तपासासाठी मंजूरी दिली आहे. सुशांत १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या मृत्युनंतर २ दोन महिने झाले तरी त्याच्या मृत्युचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बिहार सरकारच्या सांगण्यावरुन केंद्राने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. 

हे ही वाचा: सुशांतच्या असिस्टंटचा खुलासा- सुशांतच्या पैश्यांनी रिया करायची पूजा, तो पूर्णपणे बदलला होता

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याविषयची माहिती दिली आहे की बिहार सरकारने केलेल्या शिफारशीमुळे केंद्राने सुशांतच्या मृत्युचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यांनी सांगितलं की  रिया चक्रवर्तीने देखील केंद्राकडे सीबीआय तपासाची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात आता रियाच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे ज्यामध्ये सुशांत प्रकरणाचा तपास पटनावरुन मुंबईकडे ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. 

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पटनामध्ये केस दाखल केली होती. रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप केला गेला आहे. याविषयी बिहारचे पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी मुंबईला आले होते मात्र त्यांनी आरोप केला आहे की मुंबई पोलिस यात सहकार्य करत नाहीयेत. सोबतंच टीमला लीड करण्यासाठी आलेल्या आयपीएस विनय तिवारी यांना देखील मुंबईमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं.

यानंतर बिहार सरकार आणि सुशांतच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सीबीआय तपास होण्यासाठी आवाज उठवला. सुशांतचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी, मंत्री गेल्या अनेक दिवसापासूनंच सुशांत प्रकरणात सीबीआय तपासाची मागणी करत होते. 

आता हे प्रकरण सीबीआयच्या हातात गेल्यावर आणखी कोणत्या गोष्टींचा खुलासा होणार? तसंच आरोपी लवकरात लवकर पकडला जाणार का? याकडेच सगळ्यांच लक्ष आहे.  

centre accepts bihar governments recommendation for cbi probe into sushant rajput death case