'..अन 'चला हवा येऊ द्या'ची मंडळी घाबरली

टीम ई सकाळ
सोमवार, 5 जून 2017

आज छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'चला हवा येऊ द्या'चे नाव घेतले जाते. निलेश साबळे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे या सगळ्या मंडळींनी अत्यंत कष्टाने हा शो पुढे आणला. आता तर त्यांचा भारत दौरा सुरू आहे. या मधल्या काळात ही सगळी मंडळी 'एस्सेल वर्ल्ड'लाही जाऊन आली. त्याचा भागही प्रसारीत झाला आहे. यात वेगवेगळ्या राईडस वर त्यांनी केलेली धमाल दिसली. पण आतली बातमी थोडी वेगळी आहे. या शूटमध्ये सुरूवातीला सर्व मंडळी सहभागी झाले. पण नंतर मात्र त्या राईडसचा एकंदर अवतार पाहता अनेकांनी यात न बसणे पसंत केले. 

मुंबई : आज छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'चला हवा येऊ द्या'चे नाव घेतले जाते. निलेश साबळे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे या सगळ्या मंडळींनी अत्यंत कष्टाने हा शो पुढे आणला. आता तर त्यांचा भारत दौरा सुरू आहे. या मधल्या काळात ही सगळी मंडळी 'एस्सेल वर्ल्ड'लाही जाऊन आली. त्याचा भागही प्रसारीत झाला आहे. यात वेगवेगळ्या राईडस वर त्यांनी केलेली धमाल दिसली. पण आतली बातमी थोडी वेगळी आहे. या शूटमध्ये सुरूवातीला सर्व मंडळी सहभागी झाले. पण नंतर मात्र त्या राईडसचा एकंदर अवतार पाहता अनेकांनी यात न बसणे पसंत केले. 

या एपिसोडचे शूट करण्यासाठी 'चला हवा..'ची सगळी टीम एस्सेल वर्ल्डला दाखल झाली. पहिल्या दोन तीन राईडसमध्ये सगळे बसले. नंतर मात्र यातून काहींनी काढता पाय घ्यायचे ठरवले. कारण या उल्ट्या पुल्ट्या होणाऱ्या राईडसवर बसणे म्हणजे खरेतर पोटात गोळा यायचा प्रकार होता. त्यात बसल्यावर आरडाओरड होणेही साहजिक होते. यात मजा करताना पोटात होणारी कालवाकालव आणि सतत ओरडून बसणारा आवाज लक्षात घेता काहींनी या राईडसना लांबून टाटा करणेच पसंत केले. तो एपिसोड जर तुम्ही परत पाहिलात तर कोणी कोणी यात विश्रांती घेतली हे सहज लक्षात येते. 

या शूटला असलेले भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांनी रिस्क न घेता ही ट्रीप गमती जमती करत पूर्ण केली. 

Web Title: chala hava yeu dya

टॅग्स