
Kushal Badrike: 'माणसं आपली असतात आणि नसतातही..', कुशलनं एवढी गंभीर पोस्ट पहिल्यांदाच केलीय..काय घडलं?
Kushal Badrike म्हणजे 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडीच्या मंचावरचा एक हिरा...गेली अनेक वर्ष या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचे निखळ मनोरंजन करणारा कुशल आपल्या अचूक क़ॉमेडी टायमिंगमुळे घराघरात प्रसिद्ध झाला आहे.
कुशल आज 'चला हवा येऊ द्या' या आपल्या शो सोबतचअधनं-मधनं सिनेमातूनही आपली अभिनयाची चणूक दाखवताना दिसतो.
'एक होता काऊ','पांडू' या सिनेमांतून मध्यवर्ती भूमिकेत चमकलेल्या कुशलनं आपण केवळ विनोदीच नाही तर वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करू शकतो हे देखील दाखवून दिले आहे. (Chala Hawa Yevu Dya Actor Kushal Badrike Post)
कुशल बद्रिके सोशल मीडियावर भलताच सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्याविषयी देखील पोस्ट करताना दिसतो. तो अनेकदा आपल्या पत्नी आणि मुलासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो अन् चर्चेत येतो.
आता नुकतीच कुशलनं एक पोस्ट केली आहे ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यात त्यानं मनातील एक भावना बोलून दाखवली आहे. यामुळे कुशलचं काही बिनसलंय का असं उगाच वाटून राहिलंय लोकांना.
कुणी त्यानं लिहिलेल्या त्या पोस्टची वाहवा करताना दिसतंय तर कुणाला त्याचं काहीतरी बिनसलंय म्हणून चिंता लागून राहिली आहे. सेलिब्रिटींनीही मजेदार कमेंट्स केल्यात कुशलच्या पोस्टवर.
चला जाणून घेऊया नेमकं काय लिहिलंय अभिनेत्यानं त्या पोस्टमध्ये?
हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
कुशल बद्रिकेनं लिहिलंय, ''माणसं आपली असतात आणि नसतातही,जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू.
नाही म्हणजे आठवण येते त्यांची, पण आता अगदी पूर्वीसारखं आयुष्य अडत नाही त्यांच्याशिवाय,
सवयीने आपण आता दोन चहा, दोन कॉफी सांगत नाही, पावभाजी वर दोन पाव “एक्स्ट्रा” सांगत नाही,
“वन बाय टू” चं शेअरिंग “मॅच्युरिटीच्या बेरिंग” मध्ये हरवून गेलय कुठेतरी.
फक्त “आपल्याकडून माणसं जशी मागे सुटत जातात ना तसे, आपणही थोडे थोडे मागे सुटत जातो त्यांच्यासोबत”.
पण तरीही एक दिवस सगळं नीट होईल ही संभावना रहातेच मनात.
“ राहून गेल्या हाती,
संभावनांच्या वेण्या !
विण गुंफता जीवाची,
तू एकटा केविलवाण्या” !! :-सुकून