
नुकत्याच स्कॅम नावाच्या वेबसीरीजमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय झालेल्या हंसल मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी मोठ्या खुबीने सगळ्या एका वेगळ्या विषयाची मांडणी छलांग चित्रपटाच्या माध्यमातून केली आहे.
मुंबई - महिंद्र उर्फ मॉन्टीला त्याच्या आयुष्यात अनेक अपयशांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्यासाठी तो पुन्हा कुठल्याही नवीन गोष्टीचा स्वीकार करताना घाबरतो. त्याच्या वडिलांच्या वशिल्याने का होईना त्याला हरियाणातल्या एका शाळेत पी टी शिक्षक म्हणून नोकरी मिळाली आहे.
अशा या मॉन्टीच्या आयुष्यात जोपर्यत निलिमा येत नाही तोवर सगळं सुरळीत सुरु होतं. त्यानंतर त्याचं गणित कोलमडलं. तो तिच्या प्रेमात पडला. निलिमाला मॉन्टीसारखा नवरा पसंत आहे पण, तिच्या काही अटी आहेत. त्या कुठल्या यासाठी छलांग पाहावा लागेल. राजकुमार राव, नुसरत भरूचा, जीशान अली अयूब, सौरभ शुक्ला, सतीश कौशिक, इला अरुण यासारख्या मातब्बर कलाकारांची फौज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच स्कॅम नावाच्या वेबसीरीजमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय झालेल्या हंसल मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी मोठ्या खुबीने सगळ्या एका वेगळ्या विषयाची मांडणी चित्रपटाच्या माध्यमातून केली आहे. मॉन्टीची भूमिका साकारणा-या राजकुमार रावची भूमिका छान झाली आहे. मात्र 'लुडो' पेक्षा भारी नाही. त्याच्या वरिष्ठ पी टी शिक्षकाच्या भूमिकेत असणा-या जीशान अली अयूबचं काम लक्ष वेधून घेणारं आहे. तर नुसरत भरुचानेही ठीकठाक अभिनय केला आहे.
मॉन्टीला आपला नवीन सहशिक्षक आकाश (जीशान अली आयुब) याच्याविषयी भीती आहे. तो आल्याने आपले स्थान धोक्यात आले असून या शाळेतून आपल्याला जावे लागणार ही भीती त्याच्या मनात आहे. अखेर त्य़ांच्यात होणारी एक स्पर्धा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. तो प्रेक्षकांनी मिस करु नये. अशाप्रकारे एका हलक्या फुलक्या विषयाला प्रभावीपणे सादर करण्यात मेहता यशस्वी झाले आहे.
मेहता यांनी राजकुमार राव .याला बरोबर घेऊन ‘शाहिद’, ‘सिटी लाइट्स’, ‘अलीगढ़’ और ‘ओमर्टा’असे चित्रपट केले आहेत. यात राजकुमारच्या सुंदर अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे.
चित्रपटाच्या शेवटी मेहता यांनी पालकांना एक महत्वाचा संदेशही दिला आहे. जो आताच्या काळात उपयोगी आहे.
सौरभ शुक्ला, सतीश कौशिक आणि इला अरुण यांचाही अभिनय एकदम खास आहे. जीशान आयुबला राजकुमार रावच्या तुलनेत कमी संधी मिळाली असली तरी त्याचा अभिनय ठळकपणे जाणवणारा आहे. असे म्हणावे लागेल. या चित्रपटातील संवाद विशेष जमेची बाजु म्हणता येईल. थोडासा हल्का फुल्का विषयावरील हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा आहे. असे म्हटल्यास वावगं ठरु नये.