चार्लीची नवी मालिका 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

"कै से ये यारिया' या मालिकेतील डॅशिंग मुक्ती म्हणजेच चार्ली चौहान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मैत्रीच्या नात्याची एक सुंदर गोष्ट "एम टीव्ही'वरील "कैसे ये यारिया' मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या मालिकेचा नंतर दुसरा सिझनही प्रदर्शित झाला. पण त्याला मात्र पहिल्याइतका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मालिकेचं कथानक आटोपतं घ्यावं लागलं. आणि ती मालिका बंद झाली. पण या मालिकेतील तरुण कलाकारांची फौज सध्या इतर वाहिन्यांवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसतेय.

"कै से ये यारिया' या मालिकेतील डॅशिंग मुक्ती म्हणजेच चार्ली चौहान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मैत्रीच्या नात्याची एक सुंदर गोष्ट "एम टीव्ही'वरील "कैसे ये यारिया' मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या मालिकेचा नंतर दुसरा सिझनही प्रदर्शित झाला. पण त्याला मात्र पहिल्याइतका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मालिकेचं कथानक आटोपतं घ्यावं लागलं. आणि ती मालिका बंद झाली. पण या मालिकेतील तरुण कलाकारांची फौज सध्या इतर वाहिन्यांवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसतेय. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कैसी ये यारिया या मालिकेत मुक्तीची भूमिका करणारी चार्ली चौहान नव्या लूकसह सज्ज झालीय. तरुणाईच्या आवडत्या "झिंग' चॅनेलवर "ए जिंदगी' नावाची नवी मालिका येतेय. या मालिकेत चार्ली एका स्टंट वूमनची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा ऋत्विक धनजानी हा निवेदक असणार आहे. चार्लीने आतापर्यंत "एम टीव्ही रोडीज'मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतल्यानंतर "बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर', "गुमराह', "नच बलिये', "प्यार तूने क्‍या किया', "ये है आशिकी' या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. पण तिला खरी ओळख दिली ती "कैसी यारिया' मालिकेतील मुक्तीच्या भूमिकेने. "नच बलिये'मध्ये तिने आपल्या नृत्यकौशल्याने तिच्या फॅन्सना सुखद धक्का दिला. अभिनय आणि नृत्यात रस घेणारी चार्ली गातेही खूप छान. तिच्या मित्रांच्या आग्रहाखातर तिने "तिनका तिनका जरा जरा' हे गाणं खास तिच्या स्टाईलमध्ये रेकॉर्ड केलं होतं. स्क्रीनवर डॅशिंग दिसणारी चार्ली प्रत्यक्षातही तशी आहेच. याचा प्रत्यय आला तो एका फॅशन शोच्या निमित्ताने. एकदा बंगलोर फॅशन वीकच्या रॅम्प वॉकमध्ये तिला नाकारलं गेलं होतं. पण त्याच फॅशन शोच्या रॅम्प वॉकमध्ये तब्बल 7 वर्षांनी ती सहभागी झाली. या वेळी तिला रॅम्प वॉकसाठी आयोजकांकडून खास बोलावणं आलं होतं. त्यामुळे चार्ली खूप खुश झाली आणि तेव्हा पत्रकारांशी बोलताना याआधी आपल्याला नाकारलं गेल्याचं सांगितलं. अशीही बिनधास्त चार्ली बीबीसी वर्ल्डवाईडची निर्मिती असलेल्या "ए जिंदगी' या मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या मनमोकळा अंदाजात येतेय. वेल डन चार्ली...  

Web Title: charlie chauhan new serial