Prajakta Mali: हास्यजत्रा फेम चेतनाला नवऱ्याने दिलं खास गिफ्ट, निमित्त ठरली प्राजक्ता माळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 chetena bhat husband gave a special gift to wife from maharashtrachi hasyajatra prajakta mali

Prajakta Mali: हास्यजत्रा फेम चेतनाला नवऱ्याने दिलं खास गिफ्ट, निमित्त ठरली प्राजक्ता माळी

Prajakta Mali Chetana Bhat News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सध्या काही महिन्यांच्या विश्रांतीवर आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. हास्यजत्रा बंद झाल्याने प्रेक्षक या शो ला मिस करत आहेत.

हास्यजत्रेतील अशीच एक कलाकार प्रेक्षकांची लाडकी आहे. ती कलाकार म्हणजे चेतना भट. चेतनाचं भुवई उंचवून समीर चौगुलेची मुलगी होण्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये फेमस आहे. याच चेतनाला तिच्या नवऱ्याने एक खास गिफ्ट दिलंय. निमित्त ठरली प्राजक्ता माळी.

(chetena bhat husband gave a special gift to wife from maharashtrachi hasyajatra prajakta mali)

चेतनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. यात चेतना दागिने आणि साड्यांनी सजली असून साजशृंगार लेवून सुंदर दिसतेय.

चेतनाने यासाठी तिचा नवरा मंदार चोळकरचे आभार मानले आहेत. मंदारने लाडकी बायको चेतनाला हे खास दागिने दिले आहेत.

चेतनाने 'जोंधळे मणी गुंड' आणि कानातले परिधान केले आहेत. विशेष म्हणजे या दागिन्यांचं निमित्त ठरली आहे प्राजक्ता माळी.

चेतनाला नवऱ्याने दिलेल्या या गिफ्टमागे प्राजक्ता माळीच्या अप्रत्यक्ष हात आहे. याचं कारण म्हणजे..

चेतनाच्या नवऱ्याने प्राजक्ता माळीच्या प्राजक्तराज मधून हे अस्सल पारंपरिक दागिने चेतनाला भेट दिले आहेत.

चेतनाने यासाठी नवरा आणि प्राजक्तराजचे आभार मानले आहेत. नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमा निमित्त चेतनाला तिचा नवरा मंदार चोळकरने हे खास गिफ्ट दिलंय.

आपल्या सर्वांना माहीतच आहे की, प्राजक्तराज हा प्राजक्ता माळीचा दागिन्यांचा ब्रॅण्ड आहे. राज ठाकरेंच्या हस्ते या ब्रँडचं उद्घाटन झालंय. प्राजक्ता माळी वेळोवेळी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या ब्रँडचं प्रमोशन करताना दिसते.

प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. प्राजक्ता सुद्धा आता ब्रेकवर असून तिच्या नवीन सिनेमाची किंवा मालिकेची तिचे चाहते वाट बघत आहेत. आता २ महिन्यांच्या ब्रेकनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा सुरु होईल.