यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमांना.. मराठी सिनेसृष्टीसाठी मुख्यमंत्री Eknath Shinde चा महत्वाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 eknath shinde, devendra fadanvis, marathi film industry

यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमांना.. मराठी सिनेसृष्टीसाठी मुख्यमंत्री Eknath Shinde चा महत्वाचा निर्णय

Chief Minister Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेत असतात.

मराठी सिनेसृष्टिला चालना देण्यासाठी आणि चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्वांनी शिंदे - फडणवीस सरकारचं कौतुक केलंय.

(Chief Minister Eknath Shinde important decision for Marathi film industry )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, मराठी सिनेमांना तीन महिन्यात शासकीय अनुदान मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमा मराठी इंडस्ट्रीत निर्माण होत आहेत. या सिनेमांसाठी याशिवाय अन्य विषयांवरील प्रेरणादायी सिनेमांसाठी सरकार १ कोटीचे अनुदान देणार आहे.

याशिवाय अनेक मराठी सिनेमे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं नाव कोरतात. या सिनेमांना दुप्पट शासकीय अनुदान देण्याचा निर्णय शिंदे - फडणवीस सरकारने घेतला आहे.

याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने 'फिल्म बाजार' ही ऑनलाईन वेबसाईट तयार करण्याची घोषणा केली आहे.या वेबसाईटच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये स्वप्नील जोशी, महेश कोठारे, संजय जाधव असे अनेक मराठी कलाकार सहभागी असतील.

मराठी सिनेमा रिलीज झाल्यावर आर्थिक नुकसान झाल्यास निर्मात्यांना शासनाकडून काही मदत करता येईल का, याचाही अभ्यास समितीकडून केला जाणार आहे.

त्याचबरोबर चित्रपटांची निर्मिती करताना कोणत्याही अडचणी आल्यास शासनाकडून तातडीची मदत केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या मराठी सिनेसृष्टीला महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे मोठा बूस्टर मिळणार आहे.

या निर्णयामुळे मराठी मनोरंजन विश्वात निर्माण होणारे अनेक सिनेमे आर्थिक गोष्टींसाठी अडकून राहणार नाहीत. शासनाच्या मदतीमुळे मराठी सिनेमा निर्मिती करणाऱ्या अनेक व्यक्तींना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे यात शंका नाही.