रंग माझा वेगळा मालिकेतील कार्तिकीने सोडली मालिका ..पालकांनी सांगितलं कारण..

मालिका एका महत्वाच्या टप्प्यात आल्यानंतर साईशाने ही मालिका सोडली आहे.
child actress saisha has left the serial Rang Maza Vegla
child actress saisha has left the serial Rang Maza Veglaesakal

स्टार प्रवाहवरील मालिका रंग माझा वेगळा या मालिकेत छोट्या कार्तिकीची भूमिका महत्वाची आहे.(Saisha Bhoir)मालिकेतील कार्तिकी म्हणजेच खऱ्या आयुष्यातील साईशा भोईर.मात्र ही बालकलाकार मालिका सोडून जात असल्याचं पुढे येतंय.मालिका एका महत्वाच्या टप्प्यात आल्यानंतर साईशाने ही मालिका सोडली आहे.तिच्या जागी आता या मालिकेत प्रेक्षकांना नवी बालकलाकार बघायला मिळणार आहे.

साईशा बालकलाकार असली तरी तिचे सोशल मीडियावर लाखात फॉलोवर्स आहेत.साईशाच्या आईवडिलांनी मालिका सोडण्याचं कारण सांगण्यासाठी इन्स्टाग्रामवर नुकतंच एक लाईव्ह केलं होतं.त्यात ते म्हणाले, "स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेत साईशा आता दिसणार नाही.जरी ती मालिकेत नसली तरी सोशल मीडियावर तुमच्या भेटीला येत राहिल.कार्तिकीच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.(Star Pravah Serial)आम्ही कल्याणला राहतो आणि मालिकेचं शूटिंग मालाडला होतं.दररोज प्रवासात अडीच तास लागतात.त्यामुळे तिच्या शाळेकडे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आहे.तिच्या तब्बेतीवरही परिणाम होऊ लागला."

साईशा या मालिकेतून जरी ब्रेक घेत असली तरी ती दुसऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.तिची दुसऱ्या प्रोजेक्टची माहितीही प्रेक्षकांना सोशल मीडियावरूनच कळणार आहे.रंग माझा वेगळा या मालिकेत आता नवी बालकलाकार कोण असणार आहे याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com