चिरंजीवी आणि बिगबी 'सई रा'मध्ये एकत्र झळकणार

Chiranjeevi and Amitabh Bacchan in movie Sye Raa
Chiranjeevi and Amitabh Bacchan in movie Sye Raa

मुंबई : दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी आणि चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन एकाच चित्रपटात झळकणार आहेत. चिरंजीवीच्या आगामी 'सई रा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटात बिगबी बघायला मिळतील. त्यामुळे या दोन दिग्गजांच्या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच आहे.

दूधात साखर म्हणजे चिरंजीवी यांचा आज वाढदिवस आहे. साउथचे चित्रपटप्रेमी त्यांच्यावर अपार प्रेम करतात. त्यांचा एखादा चित्रपट येणार असेल तर त्यांचा फॅन क्लब अक्षरश: लाइन लावून तिकीट घेऊन चित्रपट पाहतात. सुपरस्टार रजनीकांतप्रमाणेच चिरंजीवी यांचाही एक वेगळाच फॅन क्लब आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर आज #HBDMegaStarChiranjeevi आणि #HBDEvergreenMegaStar असे ट्रेंड सुरु आहेत.

सोशल मिडियावरती आज मोठ्या प्रमाणात याचीच जोरात चर्चा सुरु आहे. साउथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट 'सई रा नरसिम्हा रेड्डी' चा टीजर काल रिलीज झाला. टीजरवरून चित्रपटाची कथा आणि अॅक्शन खूप दमदार असेल असे दिसते आहे.

तसेच चित्रपटातील ग्राफिक्सही खूप दमदार दिसत आहे. ही कथा स्वातंत्र्य सेनानीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. टीजर पाहिल्यानंतर सर्वांचीच उत्सूकता आता वाढली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com