चित्रडोसा : 'दी थलपती!'

अप्पा बळवंत, मुंबै
Friday, 17 January 2020

खरेच, माणसे या माणसावर, म्हणजे राजमान्य राजेश्री श्री. रजनीकांत, अभिनेते, चैन्नै यांच्यावर एवढे प्रेम का बरे करीत असतील? त्यांचे अचाट व अफाट ताकदीचे प्रयोग यांबाबत असंख्य कौतुक विनोद का बरे केले जात असतील व पुणेरी पाट्यांइतुकेच ते लोकप्रिय का बरे झाले असतील? 
प्रश्नच आहे. 

चित्रडोसा - २
(अर्थात साऊथच्या चित्रसंस्कृतीचे झेपेल तितके रसग्रहण)

काही काही प्रश्न पाहा, आपल्याला उगाचच पडत असतात… व्हाट्स्यापवरच्या फॉरवर्डी संदेशचित्रांसारखे. 
त्यांचा आणि आपला तद्दन काहीही संबंध नसतो. त्यांचे उत्तर समजा आपल्याला गावलेच, तरी त्याने आपल्या आयुष्यात काडीमात्र फरक पडणार नसतो. आपल्याला काहीही अक्कल नाही, हे आपल्या उदाहरणार्थ बॉसचे वा बायकोचे किंवा बॉस-बायकोचे मत काही त्याने बदलणार नसते. तरीही ते आपले डोक्यात पडतातच. 

म्हणजे उदाहरणार्थ, हातगाडीवर ताक विकणा-यांच्या गाडग्यांवर जे फडके गुंडाळलेले असते, ते लाल रंगाचेच का असते? किंवा बॉ, झेरॉक्सच्या पाट्यांचा रंग पिवळाच का असतो? किंवा आपली आयशी आपल्याला घरी का बरे चकलीबरोबर हिरवी चटणी देत नाही? किंवा आपण घरी कांद्याच्या फोडीस लिंबू का बरे लावत नाही? झालेच तर, राजमान्य राजेश्री रजनीकांत हे एवढे लोकप्रिय कसे काय असतात? 

चित्रडोसा : साऊथचे चित्रपट - एक पाहणे…

खरेच, माणसे या माणसावर, म्हणजे राजमान्य राजेश्री श्री. रजनीकांत, अभिनेते, चैन्नै यांच्यावर एवढे प्रेम का बरे करीत असतील? त्यांचे अचाट व अफाट ताकदीचे प्रयोग यांबाबत असंख्य कौतुक विनोद का बरे केले जात असतील व पुणेरी पाट्यांइतुकेच ते लोकप्रिय का बरे झाले असतील? 
प्रश्नच आहे. 

Image result for rajinikanth

आणि हा आजचा प्रश्न नाही. हे सवालिया निशान - नेमके सांगायचे, तर - आम्ही बारावीला ड्रॉप घेतला होता त्या प्राचीन काळापासून आमच्या मनी फडकत आहे. अधिक नेमके सांगायचे, तर एका व्हिडिओ थिएटरी ‘गंगवा’ नामक एक अतिथोर चित्रपट पाहण्याची संधी आम्हांस लाभली तेव्हापासून या प्रश्नाने आमचा बिक्रम-बेताल करून टाकलेला आहे. 

आता गतजन्मीचे कोणते पुण्य वा पाप फळाला आले होते म्हणून आम्ही तो चित्रपट नगदी दोन रुपयांचे तिकिट फाडून पाहिला हे सांगणे तसे कठीणच. अर्थात ही आमुची आत्ताची सद्भावना. त्या वेळी मात्र सकाळी नऊचा खेळ हाऊसफुल्ल झाला म्हणून व्हिड्यो थेटराच्या मालकाच्या मुलास लोणी लावून दुपारी बाराच्या शोचे तिकिट हस्तगत केले होते आम्ही. हा एवढा आटापिटा करण्याचे कारण म्हणजे आमुचा उत्तम नामक परममित्र.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for rajinikanth

धान्यबाजारातल्या कट्ट्यावर बसून गप्पांचा गृहपाठ मारत असताना तो म्हणाला होता, ‘अरे लई भारी हिरो आहे तो. काय फायटिंग करतो. अन् काय सिग्रेट पेटवतो… बच्चनपेक्षा सरस.’
‘नाव काय रे त्याचं?’
‘माहित नाय?… रजनीकांत. अंधा कानून बघ त्याचा. लई भारी. असा डोक्याडोक्यानी मर्डर करतो ना व्हिलनच्या…’
यानंतर उत्तमने अंधा कानून या चित्रपटाचा व त्यातील रजनीकांत या नायकाचा जो समग्र परिचय करून दिला तो ऐकल्यानंतर त्यानंतर आमच्या दोन्ही मेंदूंनी मिळून त्यासंबंधाने एकच निकाल घेतला, की जन्मास आला हेला व रजनीकांतचा चित्रपट न पाहताच मेला असे दुर्भाग्य आपल्या वाट्यास येऊ नये म्हणून या महोदयांचा एक तरी चित्रपट आपण पाहायचाच. तेव्हा आमुच्या मातृभूमीतील व्हिड्यो थेटरी लागला होता - गंगवा. 
आज चांगलेच आठवतेय की तेव्हा तो चित्रपट पाहून आम्ही आपादमस्तक थरारलो होतो. 

Image result for rajinikanth swag

थलैवा रजनीचा 'दरबार' आलाय; फॅन्सची दिवानगी पाहून व्हाल थक्क

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे असे ते रा. रा. रजनीकांत यांचे त्यातील रुप पाहून नखशिखान्त शहारलो होतो. आमचे इंटेल इन्साइड तेवढेसे अपग्रेड नसल्याने आज फारसा स्मरणात नाही तो चित्रपट. किंतु त्यातील एक प्रसंग (यास चित्रप्रेमींच्या भाषेत शॉट असे म्हणतात.) चांगलाच आठवतोय. बहुधा क्लायमॅक्सचा प्रसंग होता तो. 

आधी व. पो. नि. सुरेश ओबेरॉय आणि जुल्मी ठाकूर रा. रा. अमरीश पुरी यांचा बदला घेण्यासाठी डाकू बनावे लागले ते आपले साधेसुधे गंगवा रा. रा. रजनीकांत यांची दिल दहलाने वाले हाणामारी होते. आता ती कशी होते हे शब्दांत सांगणे मुश्किलच. परंतु साधारणतः असे पाहा, आपले जंपिंगजॅक श्री. जितेंद्र यांस हिम्मतवाला आदी सदर्न बॉलिवूडी चित्रपटांतून ज्याने कवायतनृत्य शिकविले ना, तोच या हाणामारीचा फायटिंग मास्टर असावा. 
तर त्यांचे ते फाईटनृत्य रंगलेले असतानाच, अचानक वपोनि सुरेश ओबेरॉय यांची पोलिस फौज तेथे पोचते. ते पाहताच रजनीकांतजी तत्काळ मैदानत्याग करतात. पोलिसांच्या गोळ्यांचा अवकाळी पाऊस चुकवत ते पळू लागतात. एकही गोळी त्यांस लागत नाही हे आपले सुदैवच. हे घडले ते अर्थात एकाच कारणाने. ते म्हणजे त्या काही मिनिटांत रा. रा. रजनीकांत यांचे देही एकसमयावच्छेदेकरून मिल्खा सिंग व दीपा करमाकर अवतरले किंवा ते असेही असू शकेल, की बंदुकीच्या गोळ्यांनी रजनीकांत यांस पाहून मार्ग बदलला!

Image result for rajinikanth

'देवी'मध्ये झळकणार काजोल अन् मुक्ता बर्वे!

बंदुकीच्या गोळ्यांनी काहीही होत नाही हे पाहिल्यानंतर आपल्या त्या इंडियन पोलिसांनी रा. रा. रजनीकांत यांजवर आता बॉम्बगोळ्यांचा वर्षाव सुरू केला. पोलिसांकडे हातबॉम्ब असतात हे सामान्यज्ञान आम्हांस लाभले ते तेव्हा. परंतु त्या पोलिसांस काय माहित की आपला सामना कोणाशी आहे? 
पोलिसांनी बॉम्ब फेकल्याचे दिसताच आपले हे मिल्खासिंग धावता धावता दीपा करमाकरप्रमाणे उसळले. उसळताच त्यांच्या देही साक्षात् विराट कोहली घुसला आणि त्यांनी हवेतल्या हवेत त्या हातबॉम्बगोळ्याचा क्याच घेतला. अहाहा! केवढा चक्षुचमत्कारिक प्रसंग होता तो! पोलिस बॉम्ब फेकताहेत… रजनीकांतजी त्यांचा क्याच घेऊन पोलिसांवरच फेकताहेत… झेलबाद होऊन पोलिसांची विकेट पडताहे… हे असे मनोवेधक दृश्य आम्ही यानंतर क्वचितच पाहिले. घरच केले त्याने आमुच्या काळजाच्या गुहरात. 

यानंतर रजनीकांत यांचे अंधा कानून, बेवफाई, भगवानदादा, चालबाझ, हम आदीकरोनी तमाम हिंदी चित्रपट आम्ही भक्तीभावाने पाहिले. पुढे त्यांचे कैक तमिळ-तेलुगू डब चित्रपटही पाहिले. यांतील एकही चित्रपट असा नव्हता की ज्यात गंगवाचे पाणी नव्हते! 

Image result for andha kanoon rajinikanth

म्हणजे पाहा - सामान्य माणूस. कुटुंबावर, मित्रांवर जीवापाड प्रेम करणारा. सुखात हसणारा, दुःखात रडणारा, मधूनमधून कॉमेडी करणारा. नाचणारा. (सन्माननीय मणिरत्नम यांच्या थलपतीमधील रक्कम्मा कैयू थट्टू - म्हणजे अगे रक्कम्मा, टाळी वाजव गं - या गीतामध्ये रजनीकांत यांनी सुश्री सोनू वालिया यांच्यासमवेत केलेला पदनास्य हा आमुचा सर्वांत आवडता डान्सनंबर.) तर अशा या कुटुंबवत्सलादी जनसामान्यावर अन्याय होतो. तो त्या-त्या पटकथेनुसार कौटुंबीक, सामाजिक, राजकीय असा कसाही असू शकतो. मग त्याचे डोळे लाल होतात. असे झाले रे झाले, की इंटरव्हलच्या नंतर तो या सगळ्या अन्यायाचा बदला घेतो. रजनीकांत यांच्या चित्रपटांचा हा लसावि.  

परंतु तसे किंवा असे पाहाल, तर आपल्याकडील लक्षावधी चित्रपटांचा लसावि हाच तर असतो. तुम्हांस काय वाटते, सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय किंवा बहुजन हिताय बहुजन सुखाय किंवा तमसो मा ज्योतिर्गमय किंवा उद्धरेदात्मनात्मानम् ही काय केवळ ब्रीदवाक्येच आहेत? ते तर आपल्या चित्रपटांचे टाइम-टेस्टेडादी फॉर्म्युले आहेत.  

अक्षय कुमारचं 80 कोटींचं आलिशान घर आतुन कसं दिसतं एकदा बघाच

रा. रा. रजनीकांत हे सारे करीत असतील, तर महामहीम अमिताभजी काय वेगळे करतात किंवा फॉर दॅट म्याटर, आपले रवी तेजा, थलपती विजय, झालेच तर इकडची टायगर श्रॉफादी मंडळी अन्य कोणते दिवे पाजळतात? मग रजनीकांतच का बरे सुपरसुपर स्टार ठरतात? 
बघा, म्हणालो नव्हतो? 

Image result for rajinikanth swag

काही काही प्रश्न आपल्याला उगाचच पडत असतात. त्यांचा आणि आपला तद्दन काहीही संबंध नसतो. तरीही ते आपले डोक्यात पडतातच. त्यापैकी या गहनगूढ सवालाच्या जबाबाकडे जाऊ या पुढच्या ब्लॉगपोस्टी. दक्षिण भारतीय चित्रपटांची लयन आणि लाईन समजून  घेण्यासाठी याचे उत्तर उपयुक्त आहे.

(balwantappa@gmail.com)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitradosa south Indian movie column on Rajinikanth