
Chitrashi Rawat Wedding : सगळ्यांनी लग्नाला यायचं! 'चक दे इंडिया'च्या कोमल चौटालाचं शुभमंगल
Chitrashi Rawat Chak de India Movie Komal Chautala : बॉलीवूडमध्ये सध्या वेडींग सीझन सुरु आहे असे म्हटल्यास ती काही अतिशोयक्ती ठरणार नाही. गेल्या आठवड्यात केएल राहुल आणि बॉलीवूडचा अण्णा सुनील शेट्टीच्या मुलीचं अथियाचं लग्न झालं. त्यानंतर येत्या सहा फेब्रुवारीला प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांचे लग्न आहे. त्यातच आणखी एक गुड न्युज समोर आली आहे.
तुम्हाला शाहरुखचा चक दे इंडिया हा चित्रपट आठवतोय का, कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तर विक्रमी कमाई तर केली होतीच पण याशिवाय चाहत्यांना देखील या चित्रपटानं वेडं केलं होतं. या चित्रपटातील कोमल चौटालाची भूमिका करणाऱ्या चित्राशी रावतनं आता लग्नाचा निर्णय घेतला आहे. तिनं तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला असून तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्राशी ही उद्या तिचा बॉयफ्रेंड ध्रुव आदित्य भगवानासोबत लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. आदित्य आणि चित्राशी एकमेकांना गेल्या अकरा वर्षांपासून डेट करत आहे. त्यानंतर आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. चित्राशी आणि ध्रुवआदित्यची ओळख ही एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
प्रेममयी चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. कोमल ही प्रेक्षकांना चक दे इंडियापासून माहिती झाली. यापूर्वी तिनं काही शॉर्ट फिल्ममधून काम केले होते. मात्र शाहरुखच्या त्या चित्रपटामध्ये ती चमकली. चाहत्यांनी तिच्या भूमिकेचं कौतूकही केलं. चक दे इंडियामध्ये तिनं कोमल चौटाला या हरियाणामधल्या खेळाडूची भूमिका केली होती. त्यानंतर चित्राशा ही फॅशन, तेरे नाल लव हो गया चित्रपटामध्ये देखील दिसली.
चाहत्यांना चित्राशाच्या लग्नाची बातमी कळताच त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. आपल्या लग्नाबाबत बोलताना चित्राशी म्हणाली की, ध्रुव हा रायपूरचा आहे. आणि मी बिलासपूरची. आता आम्ही लग्न करतो आहोत. हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे. उद्या दुपारी आमचं लग्न होणार असून तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. अशी पोस्ट चित्राशानं शेयर केली आहे.