त्यांचा बाहुबली तर आपला 'भाऊबली'!

BAHUBAL
BAHUBAL

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट' , 'सैराट'पर्यंत आणि हिंदीतील 'तिरंगा', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

‘बाहुबली’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवनवे विक्रम रचले. बाहुबली २ ची ही लोकप्रियता बघता थुकरटवाडीकरांनीही मग प्रेरणा घेत ‘भाऊबली’ हा चित्रपट बनवला. ज्यात भाऊबलीच्या मुख्य भूमिकेत भाऊ कदम, देवसेनेच्या भूमिकेत श्रेया बुगडे, भल्लाळदेवच्या भूमिकेत अंकुर, शिवगामीच्या भूमिकेत सागर कारंडे तिचा पती बिजालदेवच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि कटप्पाच्या भूमिकेत कुशल बद्रिके बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्रपटात ज्याप्रमाणे स्पेशल इफेक्ट्सचा खास वापर करण्यात आलाय तसाच वापर इथेही दिसणार आहे आणि त्याच्या सोबतीला असेल विनोदाचा जबरदस्त तडका. 

येत्या सोमवारच्या भागात म्हणजे १२ जूनला रात्री ९.३० वा. झी मराठीवर हे खास स्किट बघायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com