
CID मालिकेच्या निर्मात्याचे निधन, शिवाजी साटम यांनी व्यक्त केला शोक
CID Serial Producer Passed Away: सीआयडीचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, निर्माते सिंगापूरमध्ये होते जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका करणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
(CID serial producer pradeep uppoor passed )
सीआयडीचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे. सिंगापूरमध्ये राहत्या घरी यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका करणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलंय कि, “प्रदीप उप्पूर (निर्माता, सीआयडीचा आधारस्तंभ). एक सदैव हसतमुख प्रिय मित्र, प्रामाणिक आणि स्पष्ट, मनापासून उदार असलेला.
तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यातील महत्वाचा अध्याय संपलाय…लव्ह यू अँड मिस यू बडी,” अशी पोस्ट करत शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलंय.
याशिवाय डॉ. साळुंखे यांची भूमिका साकारणारा अभिनेता नरेंद्र गुप्ता म्हणाला, “ही धक्कादायक बातमी आहे… माझेही प्रदीप सोबत खूप जुने नातेसंबंध होते.
किती छान माणूस होता तो… नव्या दुनियेत शांतपणे जग… आज मी माझ्या आयुष्याचा एक भाग गमावला.” अशी भावुक पोस्ट डॉ. साळूंखे फेम नरेंद्र गुप्ता यांनी लिहिली आहे.
CID हा सर्वात लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. हा शो 1998-2018 म्हणजेच 20 वर्षांहून अधिक काळ प्रसारित झाला सोनी टीव्हीवर टेलिकास्ट झाला. सीआयडी बीपी सिंग यांनी तयार केली आणि सोनी टीव्हीवर प्रसारित केली.
निर्माते म्हणून तर प्रदीप उप्पूर यांनी CID मालिकेच्या निर्मिती प्रक्रियेत मोठी जबाबदारी निभावली. प्रदीप यांच्या निधनाने एक चांगला आणि क्रियेटिव्ह निर्माता गमावला म्हणून कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.