चित्रपटांचे गारुड आणि प्रेक्षकांच्या रांगा

चित्रपटांचे गारुड आणि प्रेक्षकांच्या रांगा
चित्रपटांचे गारुड आणि प्रेक्षकांच्या रांगा

पणजी : प्रेक्षकांच्या अनपेक्षितपणे लागलेल्या लांबच लांब रांगा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह इंडियन पॅनोरमामधील चित्रपटांनी प्रेक्षकांवर केलेले गारुड यांमुळे 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) दुसरा दिवस गाजला. उद्‌घाटनाचा चित्रपट असलेल्या "आफ्टरइमेज'या आंद्रे वाज्दा दिग्दर्शित पोलंडच्या चित्रपटाला आजही मोठी गर्दी झाली. कॅनडाच्या"नेले', जर्मनीचा "फादो'व इराणचा "बेंच सिनेमा' या चित्रपटांना प्रेक्षकांनी दाद दिली. उद्‌घाटनाला मिळालेला थंड प्रतिसाद व नोटबंदीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या चित्रपट महोत्सवाला गर्दी होणारा नाही, हा अंदाज खोटा ठरवत प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर रांगा लावल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील "नेलीया कॅनडाच्या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. एक हजार आसनसंख्या असलेले गोवा कला अकादमीचे प्रेक्षागृह पूर्ण भरले आणि अनेकांना बाहेर थांबावे लागले.

"आफ्टरइमेज' या उद्‌घाटनाच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी आजही गर्दी केली. व्लादिस्लॉ स्तेजमिन्स्की या चित्रकाराची ही सत्यकथा. याच्या दशकात घडणाऱ्या कथेत पोलंडचे सोव्हियतीकरण होऊन स्टॅलिनवादी विचारांची पकड निर्माण होते. त्यातून कलाकारांची गळचेपी सुरू होते. आधुनिक विचारांचा हा चित्रकार या सर्वाला विरोध करतो व त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागते. कलेवर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती आणि निर्दयी शासनव्यवस्था यांतील हा संघर्ष सुन्न करतो.

आंद्रे वाज्दा या नव्वदी ओलांडलेल्या दिग्दर्शकाचा हा 65वा चित्रपट आहे. मानसिक कोंडमाऱ्या वर भर "सिनेमा ऑफ द वर्ल्ड' या विभागातील चित्रपटांमध्ये मानसिक कोंडमारा हा समान धागा दिसला. "फादो' या जर्मनीच्या चित्रपटामध्ये प्रियकराच्या संशयीवृत्तीने उद्‌ध्वस्त झालेल्या मुलीची कथा मांडण्यात आली आहे. प्रेमामध्ये संशयाच्या पिशाच्चाने शिरकाव केल्यावर दोघांचीही हाणारी ससेहोलपट चित्रपट दाखवतो. कॅनडाचा "बोरिस विदाउट बियाट्रिस' या चित्रपटही अतिमहत्त्वाकांक्षी पतीमुळे पत्नीचा होणारा कोंडमारा मांडतो. त्यामुळे पत्नीला आधार देण्याऐवजी पती आणखी वाहवत जातो आणि मग एका अज्ञात शक्तीच्या "सल्ल्या'मुळे सावरतो. बेंच सिनेमा या मोहमंद रहमानियन दिग्दर्शित चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रति साद दिला.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com