राष्ट्रीय पुरस्कार विजेते छायाचित्रकार सिवन यांचे निधन

त्यांच्या जाण्यानं टॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.
director sivan
director sivan Team esakal

राष्ट्रीय पुरस्कार विजेता छायाचित्रकार आणि दिग्दर्शक सिवन यांचे हदृयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 89 वर्षीय सिवन यांनी एक्झिट घेतली आहे. त्यांच्या जाण्यानं टॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. चित्रपट निर्माते संगीत सिवन, संतोष सिवन आणि संजीव सिवन ही त्यांची मुले आहेत. (cinematographer and director sivan dies of cardiac arrest at the age of 89)

वडिलांचा मृत्यु झाल्यानंतर मुलगा संगीत सिवननं सोशल मीडियावर एक व्टिट केले आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे, बाबा तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तुमच्याशिवाय जगाची कल्पना शक्य नाही. मात्र तुम्ही जो रस्ता दाखवला आहे त्याच्यावर चालण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आम्ही त्यासाठी तुमचे आभारी आहोत. सिवन यांचा मृत्यु झाल्याचे कळताच टॉलीवूडमधून अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.

director sivan
गाझियाबाद मारहाण : ट्वीटर इंडियाच्या एमडीला हायकोर्टाचा दिलासा!

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सिवन हे केरळ मधील पहिले प्रेस फोटोग्राफर होते. त्यांनी 1991 मध्ये आलेल्या अभयम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com