
OROP Reaction : 'ते रिटायर झाल्यानंतर....' भारताच्या सरन्यायधीशांवर बॉलीवूडच्या अभिनेत्याचे ट्विट
CJI Chandrachud reaction on one rank one pension : वन रँक वन पेन्शनशी संबंधित प्रकरणावर देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.त्यावर सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे. यासगळ्यात बॉलीवूडच्या एका अभिनेत्यानं सरन्यायाधीशांच्या त्या भूमिकेवर ट्विट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलीवूडचा वादग्रस्त अभिनेता, आपल्या परखड आणि बेताल वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या केआरके उर्फ कमाल राशिद खान यानं आता देशाचे सरन्यायाधीश यांच्याविषयी ट्विट केलं आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. यापूर्वी देखील केआरकेनं बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्यांशी पंगा घेतला होता. त्यांच्या चित्रपटांचे रिव्ह्यु करुन त्यानं त्यांचा राग ओढावून घेतला होता. यामध्ये सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटांचा समावेश होता.
Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
सलमान खाननं केआरकेच्या विरोधात कोर्टात बदनामी केल्याचे केस दाखल होती. यानंतर केआऱकेनं त्याची माफी मागितली होती. केआरकेचा वाचाळपणा काही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. कोणत्याही विषयावर अधिकारवाणीनं बोलून चर्चेत राहणं आणि वाद ओढावून घेणं यासाठी तो ओळखला जातो. आता त्यानं थेट सरन्यायाधीशांच्या निरीक्षणावर स्वताचे मत मांडले आहे.
केआरकेच्या व्हायरल झालेल्या त्या ट्विटमध्ये तो म्हणतो, सरन्यायाधीश हे जेव्हा रिटायर होतील तेव्हा त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचे पद दिले जाणार नाही. ते कोणत्याही राज्याचे राज्यपाल होऊ शकणार नाहीत. अशी टिप्पणी केआरकेनं केली आहे. त्याच्या त्या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहे.