
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड आणि त्याचे होणारे स्थलांतर यावरुन सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. काल अभिनेता अक्षय कुमार याने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
मुंबई - योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबईत आले आणि त्यावरुन मोठया गोंधळाला सुरुवात झाली आहे. योगी यांना बॉलीवूड हे युपीला न्यायचे आहे अशी चर्चा आहे त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आहे. मात्र योगी यांच्या मुंबईत येण्याचे आणि आम्ही बॉलीवूड मुंबईपासून बॉलीवूड न्यायला काही आलेलो नाही असे स्पष्टीकरणही योगींनी दिले आहे. यावरुन राजकीय पक्षाचे प्रवक्ते आणि काही कलाकार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड आणि त्याचे होणारे स्थलांतर यावरुन सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. काल अभिनेता अक्षय कुमार याने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. त्यावरुन उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. याविषयी एका वाहिनीवर झालेल्या परिसंवादात सहभागी अभिनेता सुशांत शेलार म्हणाला की, योगी आदित्यनाथ यांचा अनेकांना येत असलेला पुळका काय कामाचा, आपल्या राज्यातील महत्वाचे उद्योगधंदे दुसरीकडे नेण्याचे उद्योग यानिमित्तानं सुरु झाले आहेत. दरवेळी महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाच्या बाबत काही ठोस भूमिका घेणे महत्वाचे आहे.
प्रख्यात दिग्दर्शिका अनघा घैसास यावेळी म्हणाल्या, सध्या जी काही ओरड चालली आहे ती विनाकारण आहे असे वाटते. मुळातच मुंबईला कुणीही ओरबाडलेले नाही. हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रात जितके निर्माते तेवढेच काही अभाषिक दिग्दर्शक व निर्मातेही आहेत हेही लक्षात घ्यावे. योगी आले म्हणजे त्यातून वेगळेपणा दाखविण्याचा प्रयत्न नाही. कंगणा ही एकटी सगळ्यांना भारी पडल्याची टिप्पणी त्यांनी केली.
तर एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, एकट्या मुंबईतून भारताला मिळणारा रेव्ह्युनु मोठा आहे. अशात युपीची आकडेवारी फार तोकडी आहे. बॉलीवूड महाराष्ट्रातून युपीला नेणं चूकीचे आहे. ते कधीही होऊ शकत नाही. योगींनी आपल्या राज्यातील लोकांना सांगून स्वतंत्र असे बॉलीवूड निर्माण करावे त्याला कोणीही नाही म्हटलेलं नाही हे लक्षात घ्यावे.
हे ही वाचा: गौहर आणि जैद 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, वेडिंग कार्डची चर्चा
राहूल नार्वेकर यांनी योगी यांच्या बाजूने भूमिका घेतली. ते म्हणाले, ज्यावेळी कुठलीही इंडस्ट्री हलविण्याचा विचार केला जातो ते प्रत्यक्षात येणं कठीण आहे. बॉलीवूड युपीला नेणं म्हणजे एखादं भाजीचं टोपलं उचलून नेण्यासारखं नाही. त्याला अनुकूल वातावरणाची गरज हवी असते याचा कुणीही विचार करत नाही. मुंबईला सुरक्षितता देण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज आहे त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. स्वताचे अपयश झाकण्यासाठी काही राजकीय पक्ष या गोष्टीकडे पाहत आहेत. हे सांगावेसे वाटते.