'कोब्रा' मध्ये इरफान पठाण ; टीझरला प्रचंड प्रतिसाद

Cobra marks the debut of former cricketer Irrfan Pathan in the Tamil film industry
Cobra marks the debut of former cricketer Irrfan Pathan in the Tamil film industry

मुंबई - क्रिकेटचं मैदान गाजवून सोडल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा एकेकाळचा वेगवान गोलंदाज अभिनयातून पुनरागमन करण्यासाठी तयार झाला आहे. सोशल मीडियावर 'कोब्रा' या चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. अल्पावधीतच त्याला लाखो लाईक्स आणि कमेंटसही मिळाल्या आहेत. तसेच तो ट्रेडिंगचा विषय झाला आहे. त्यामुळे इरफानच्या नावाची चर्चा मोठया प्रमाणावर होताना दिसत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटात क्षेत्रातील प्रख्यात कलाकार के एस रविकुमार हा आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी इरफान पठाणचा आगामी चित्रपट ‘कोब्रा’चा टीझर शेअर केला आहे. कोब्रा हा तामिळ चित्रपट असून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. क्रिकेट सोडल्यानंतर इरफान हा निवेदकाच्या भूमिकेत दिसला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून तो करत असलेलं कमबॅक प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रचंड प्रमाणात या चित्रपटाचा टीझर लोकप्रिय होत आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या संख्येनं चित्रपटांचे टीझर आणि ट्रेलर लाँच झाले आहेत. मागील वर्षी कोरोनामुळं चित्रपट क्षेत्राला मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरं जावे लागले होते. त्याचा फटका कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांना बसला होता. त्या त्या राज्यांमधील प्रशासनानं चित्रिकरणाला परवानगी दिली असली तरी अद्याप तितक्या मोठया पध्दतीनं चित्रिकरण सुरु झालेलं नाही. नवे वर्ष प्रेक्षकांसाठी आगळी वेगळी पर्वणी देणारं ठरणार आहे. याशिवाय अनेक बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होणार आहे. 

अभिनेता विक्रम आणि इरफान पठाणच्या ‘कोब्रा’ दिग्दर्शन Gnanamuth यांनी केले असून म्यूझिक ए आर. रेहमान यांनी दिले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. इरफान आणि विक्रमसोबत चित्रपटात केएस रविकुमार, मृणालिनी, कनिका, पद्मप्रिया हे कलाकार दिसणार आहेत. इरफानच्या सहभागामुळे चाहत्यांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. 
 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com