Raju Shrivastav: विनोदवीर राजू श्रीवास्तव अनंतात विलीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shrivastav: विनोदवीर राजू श्रीवास्तव अनंतात विलीन

Raju Shrivastav: विनोदवीर राजू श्रीवास्तव अनंतात विलीन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे काल (21 सप्टेंबर) निधन झाले. आज (22 सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू यांना त्यांच्या भावाने मुखाग्नी दिला. राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांच्या कायमच आठवणीत राहतील.

राजू श्रीवास्तव यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे मित्र आणि चाहत्यांना अश्रू अनावर झाले. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने लोक आले असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी त्यांचा जवळचा मित्र आणि कॉमेडियन सुनील पालने राजू यांना आपले गुरु असल्याचं सांगत त्यांच्याकडून फार काही शिकायला मिळाल्याचं म्हटलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन श्रद्धांजली वाहिली. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासुन ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Comedian Raju Srivastav Cremated In Delhi Family Members Bid Tearful

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..