काय झालं भारतीला? अचानक घटवलं 15 किलो वजन

कॉ़मेडी क्वीन म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं अशा भारती सिंह ची गोष्ट काही और आहे.
काय झालं भारतीला? अचानक घटवलं 15 किलो वजन

मुंबई - कॉ़मेडी क्वीन म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं अशा भारती सिंह ची गोष्ट काही और आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. काही दिवसांपूर्वी ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्याचे कारण तिचा आणि तिच्या पतीचा ड्रग्ज केसमध्ये असलेला सहभाग. यामुळे तिला मुंबई पोलिसांनी अटक देखील होती. तिला चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. अशी भारती सिंह आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. तिनं घटवलेलं वजन. जे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

भारतीची (Bharti Singh) ओळख तिच्या कॉमेडीच्या टायमिंगसाठी आहे. आता तर ती वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये वावरताना दिसते. त्यामध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत आहे. ती प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या भारतीनं सोशल मीडीयावर आपला एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला आहे. ज्याला प्रेक्षकांनी, तिच्या चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. बऱ्याचदा नेटकऱ्यांनी भारतीला तिच्या वजनावरुन ट्रोल केले होते. त्यामुळे ती नाराजही झाली. आपल्याला कराव्या लागणाऱ्या बॉडी शेमिंगचा सामना यामुळे तिचा आत्मविश्वासही कमी झाल्याचे तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यानंतर भारतीनं निश्चयानं, निर्धारपूर्वक आपल्यात काही बदल घडवून आणले आहेत. त्यापैकी वजन कमी करणे हा देखील आहे. भारतीनं आता चक्क 15 किलो वजन कमी केले आहे.

काय झालं भारतीला? अचानक घटवलं 15 किलो वजन
भारती सिंह सोशल मीडियाद्वारे कमावते इतके कोटी रुपये
काय झालं भारतीला? अचानक घटवलं 15 किलो वजन
भारती सिंग पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही NCBकडून अटक, 18 तास चौकशी

त्याचं कारण म्हणजे आता (Bharti Singh) भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबानिया यांच्याकडे गुड न्युज आहे. ते आई बाबा आहे. ती गुड न्युज देण्याअगोदर भारतीनं वजन कमी करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेकदा भारतीला तिच्या जाडेपणावरुन प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. तिनं आता सहा महिन्यात १५ किलो वजन कमी केल्याची माहिती पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com