चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर अवतरलं ' जूनं ते सोनं' 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

मराठी चित्रपटाला आपल्या कलेनं समृध्द करणा-या काही जून्या कलावंतांना एकत्र बोलावून त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला आहे.

मुंबई - सध्या टेलिव्हिजनवर आवर्जून पाहावे असे जे काही मोजके कार्यक्रम राहिले आहेत त्यात विनोदी मालिका चला हवा येऊ द्या याचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. जवळपास सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी मराठी मालिका म्हणून चला हवा येऊ द्याचं स्थान अव्वलच आहे. या मालिकेत आपल्या चित्रपटाचं, गाण्याचे, नव्या कुठल्याही  एखाद्या गोष्टीचं प्रमोशन व्हावं यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात.

मराठी चित्रपटाला आपल्या कलेनं समृध्द करणा-या काही जून्या कलावंतांना एकत्र बोलावून त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला आहे. त्यासाठी अनेक जूने कलाकार चला हवा येऊ द्या च्या सेटवर आले होते. या कलाकारांमध्ये अभिनेता अशोत सराफ, निवेदिता जोशी-सराफ, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अशोक पत्की, अशोक हांडे, जयंत सावरकर हे ज्येष्ठ आणि एव्हरग्रीन कलाकार हजेरी लावणार आहेत. ‘एव्हरग्रीन सिनिअर’ असे या भागाचे नाव आहे. या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’मध्ये  एव्हरग्रीन सिनिअर या संकल्पनेनुसार   मराठी कलाविश्वीतील ज्येष्ठ कलाकारांना विशेष आमंत्रित केलं जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे कलाकार या विशेष भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सहा वर्षे झाली या मालिकेनं लोकप्रियतेची अनेक विक्रम केले. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना वेड लावलं. न थकता प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमामधील कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.त्याचसोबत या मंच्याच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commedy marathi serial chala hawa yeu dya special episode of evergreen senior