esakal | भूताचे चित्रपट पाहा, पैसे कमवा: 'या' कंपनीची ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

भूताचे चित्रपट पाहा, पैसे कमवा: 'या' कंपनीची ऑफर

भूताचे चित्रपट पाहा, पैसे कमवा: 'या' कंपनीची ऑफर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अनेकांना हॉरर चित्रपट म्हटल्यावर अंगावर काटा येतो. त्या चित्रपटांची कमालीची भीती वाटते. आपल्याकडे रामसे बंधू यांनी मोठ्या प्रमाणावर हॉरर चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला होता. त्यावरुन काही अफवाही व्हायरल झाल्या होत्या. त्या म्हणजे त्यांची निर्मिती असलेला हॉरर मुव्ही एकट्यानं थिएटरमध्ये पाहा. आणि पैसे मिळवा. मात्र आता सध्या सोशल मीडियावर अशाच एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामध्ये संबंधित त्या कंपनीनं प्रेक्षकांना 13 हॉरर चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. जर कोणी ते चित्रपट पाहिले तर अशा प्रेक्षकाला ते मोठं बक्षीसही देणार आहेत. त्यामुळे हॉरर चित्रपट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यासाठी त्या कंपनीनं तेराशे डॉलरचं बक्षीस देणार असल्याचे सांगितलं आहे. म्हणजे जवळपास एक लाख रुपये. जेव्हा एखादा प्रेक्षक संबंधित ती मुव्ही पाहत असेल तेव्हा त्याचे हार्ट बिट्स चेक करण्यात येणार आहे.

फायनान्स बज नावाच्या वेबसाईटनं यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी अशा 13 हॉरर चित्रपटांची यादी तयार केली आहे की, जे चित्रपट पाहणं प्रेक्षकांसाठी आव्हान असणार आहे. हा चित्रपट जेव्हा प्रेक्षक पाहणार तेव्हा फिटबिट नावाच्या उपकरणाचा वापर केला जाणार आहे. संबंधित त्या कंपनीनं त्या चित्रपटांची नावंही जाहीर केली आहेत. त्यात एमिटीविले हॉरर, ए क्वाईट प्लेस, ए क्वाईट प्लेस २, कँडीमॅन, इंसिडियस, द ब्लेयर विच प्रोजेक्ट, सिनिस्टर, गेट आऊट, द पर्ज, पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी, हॅलोविन यांचा समावेश आहे.

त्या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, जो कुणी प्रेक्षक हे चित्रपट पाहणार त्याला बक्षीस देण्यात येणार आहे. चित्रपट सुरु असताना फिटबिटचा वापर करणं बंधनकारक असणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी 50 डॉलरचे कार्ड वेगळं दिलं जाणार आहे. आता यासाठी अनेकांनी नावनोंदणी केली आहे. त्यासाठी शेवटची मुदत 26 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा ही ऑक्टोबरमध्ये केली जाणार आहे.

हेही वाचा: अभिनेता रमेश वलियासाला यांचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट

हेही वाचा: 'मुस्लिम म्हणून गणपतीची पूजा करायची नाही का?'

loading image
go to top