'नाय वरनभात लोन्चा..'मुळे महेश मांजरेकर अडचणीत; तक्रार दाखल

१४ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Varan Bhaat Lonacha Controversy
Varan Bhaat Lonacha ControversyInstagram

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटात मुलं आणि महिलांचं आक्षेपार्ह चित्रण केल्याने ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेनं वांद्रे इथल्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार दाखल करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. या तक्रारीत मांजरेकरांसोबतच नरेंद्र, श्रेयस हिरावत आणि एनएच स्टुडिओ या निर्मात्यांचाही उल्लेख आहे. मांजरेकरांच्या या चित्रपटात महिला आणि मुलांचं अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने चित्रण केल्याचं वकील डी. व्ही. सरोज यांनी तक्रारीत म्हटलं. १४ जानेवारी रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. (Mahesh Manjrekar News)

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शनाआधी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरून विविध स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ट्रेलरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे, त्याबाबत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य चित्रपटातून वगळण्यात यावं अशी मागणी केली होती. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून महेश मांजरेकरांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविण्यात आलं होतं.(Varan Bhaat Lonacha Controversy News)

Varan Bhaat Lonacha Controversy
Bigg Boss 15: 'आधी तुझ्या बॉयफ्रेंडला सांभाळ'; तेजस्वीवर बिपाशा भडकली

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 'A' प्रमाणपत्र दिलं आहे. 'हा अडल्ट फिल्म आहे, असं सर्व होर्डिंग्स आणि पोस्टर्सवर स्पष्ट केलं होतं', असं निर्माते म्हणाले. या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्याकाळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळे पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'मध्ये पहायला मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com