'आम्हाला वादाची सवयचं आहे'; आयकरचा पडला छापा  

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

अनुराग आणि तापसीच्या मुंबई आणि पुण्यातील 20 ठिकाणांवर आयकर विभागाचा पडलेला छापा यामुळे अनेकांचे लक्ष त्या दोघांकडे गेले आहे.

मुंबई - बॉलीवूडमधील काही कलावंतांच्या मागे नेहमीच वाद चिटकला आहे. त्या वादाभोवती ते काही अंतराने फिरत असतात. प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नु हे नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. तसेच ते सरकारच्या चूकीच्या धोरणावर ठामपणे बोलणारे जागरुक सेलिब्रेटी आहेत. अशावेळी त्यांच्यावर होणारी कारवाई ही नेमकी कोणत्या कारणामुळे केली जात आहे असा प्रश्न त्यांचे चाहते प्रशासनाला विचारत आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा नव्या प्रश्नाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनुरागनं यापूर्वी सेन्सॉर बोर्डावर केलेली टीका, नोटबंदीवर केलेली चित्रपट निर्मिती याशिवाय इतरही काही मुद्दयांचा यावेळी विचार करावा लागणार आहे. त्याचं झालं असं की, आयकर विभागानं दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नु यांच्या मुंबई, पुणे याठिकाणी असणा-या जागेवर छापा टाकला आहे. अशाप्रकारे चर्चेत येण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाही.

dev-d #indian #poster #anuragkashyap #cinema | Movie posters design, Movie  posters minimalist, Bollywood movie

अनुराग आणि तापसीच्या मुंबई आणि पुण्यातील 20 ठिकाणांवर आयकर विभागाचा पडलेला छापा यामुळे अनेकांचे लक्ष त्या दोघांकडे गेले आहे. नेमक्या याच सेलिब्रेटींवर कारवाई का असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. त्यांचे आणि सध्याच्या सरकारचे असलेले संबंध कसे आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. टॅक्स चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Thappad - Wikipedia

आपल्या अभिनयामुळे तापसीनं कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळवली आहे. तापसी लॉकडाऊनच्या वेळी चर्चेत आली होती. ज्यावेळी कोरोना वॉरियर्सच्या समर्थनार्थ पीएम मोदी यांनी देशातील नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. तेव्हा तापसीनं लिहिलं होतं की, नवीन टास्क आला आहे. सर्वांनी दिवे लावून घ्या. तिच्या अशाप्रकारच्या भूमिकेमुळे ती ट्रोल झाली होती. तिचा सांड की आख नावाचा सिनेमा आला होता. तो काही चालला नाही. तेव्हाही ती प्रेक्षकांच्या टीकेचा विषय झाली होती. याशिवाय कंगणाचं आणि तिचं भांडण सर्वश्रृत आहे.

 

जेव्हा अनुरागची गँग्स ऑफ वासेपूर फिल्म प्रदर्शित झाली होती तेव्बा त्यातील काही दृश्यांमुळे त्या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे त्याच्यावर पायल घोषनं मी टू चा केलेला आरोप सर्वांना धक्का देणारा होता. काही दिवसांपूर्वी अनुरागनं आपले सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले होते. अनुरागच्या मुलीवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या. त्यामुळे परिवारात कुठलाही वाद नको म्हणून सोशल मीडियापासून फारकत घेतली होती.

अनुरागनं सीएए कायद्याला विरोध करताना गृहमंत्री अमित शाह यांना अपशब्द वापरले होते. दुसरीकडे कंगणावर टीका केल्यामुळेही तो चर्चेत आला होता. अशाप्रकारे हे दोन्ही कलावंत वादाच्या भोवती फिरणारे असून आता नव्यानं उदभवलेला वाद किती काळ टिकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversies of director Anurag Kashyap and actress taapsee pannu