धक्कादायक! दोन हिंदी मालिकांच्या सेटवर कोरोनाबाधित!  चित्रीकरण थांबले...भीतीचे वातावरण

धक्कादायक! दोन हिंदी मालिकांच्या सेटवर कोरोनाबाधित!  चित्रीकरण थांबले...भीतीचे वातावरण


मुंबई ः दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोरोनाची लागण एका अभिनेत्रीलाच झाल्याने मोठी खळबळ उडाली होती व चित्रीकरण तत्काळ थांबविण्यात आले होते. आता येथील दोन हिंदी मालिकांच्या सेटवरही दोन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सोनी टीव्हीवरील मेरे साई आणि अॅण्ड टीव्हीवरील एक महानायक...डाॅ. बी. आर. आंबेडकर या दोन मालिकांमधील एका मराठी कलाकाराला आणि एका कर्मचाऱ्याला  कोरोनाची लागण झाली आहे. आता सेटवरील सगळ्यांचीच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या तरी चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

सरकारने दिलेल्या अटी व शर्तीनुसार नुकतेच टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी तसेच अन्य काही ठिकाणी चित्रीकरण सुरू झाले आहे खरे. परंतु आता कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सगळ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अॅण्ड टीव्हीवरील एक महानायक....डॉ. बी. आर. आंबेडकर मालिकेचे चित्रीकरण गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुरू होते. या मालिकेतल्या कलाकाराला कोरोनाचं निदान झालं आहे. संपूर्ण काळजी घेऊनही कोरोनाची लागण झाल्यामुळे सेटसह अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. सध्या वरळी इथे या कलाकारावर उपचार सुरू आहेत आणि ते सुखरूप आहेत. ते क्वारंटाईन असूनच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ते असल्याचं कळतं. त्यांना झालेल्या कोरोनात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांना कसलाही त्रास होत नसून काळजीचं कारण नसल्याचं कळतं.

सोनी टीव्हीवरील मेरे साई या मालिकेतील एका कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती पाॅझिटिव्ह आली. लगचे सेटवरल वातावरण गंभीर झाले चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. या मालिकेचे चित्रीकरण नायगाव येथे चालते. सध्या कलाकार आणि अन्य मंडळींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com