coronavirusच्या संकटात व्हायरल झालेला 'हा' सीन तुम्हाला हसवून करेल लोटपोट.

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

मानसिक ताण थोडा हलका करण्यासाठी सोशल मिडीयावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.. होय, सध्या सोशल मिडियावर आमीर खानच्या 'थ्री इडियट्स' सिनेमातील एक कॉमेडी सीन व्हायरल होत आहे.

मुंबई- संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे..कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी संपू्र्ण देश लॉकडाऊन केला गेला आहे..सगळ्या  नागरिकांना घरीच राहण्याशिवाय सध्या दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही आहे...त्यामुळे घरी राहून अनेकांना कंटाळा आलाय...

या परिस्थितीत मानसिक ताण थोडा हलका करण्यासाठी सोशल मिडीयावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.. होय, सध्या सोशल मिडियावर आमीर खानच्या 'थ्री इडियट्स' सिनेमातील एक कॉमेडी सीन व्हायरल होत आहे..हा व्हिडिओ कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीला परफेक्ट असून लोकांना खूप हसवतोय..

वाचा: लॉकडाऊनमुळे बोअर झाला असाल तर सुनिल ग्रोवरने सांगितलेला 'हा' उपाय वाचलाच पाहिजे

जगभरातील नागरिक कोरोना व्हायरसच्या या संसर्गामुळे हैराण झाले आहेत..मार्केट बंद, चित्रपटगृह बंद आणि रस्ते देखीस ओस पडले आहेत.अशा विचित्र परिस्थितीत देखील माणूस हसण्याची संधी सोडू शकत नाही..कारण हेच त्यांना या संकटापासून लढण्यासाची शक्ती देऊ शकेल, मानसिक ताण कमी करु शकेल..तेव्हा आता तुम्हीही बॉलीवूडच्या या सुपरहिट सिनेमातील सीनवर एक नजर टाका-

तुम्हाला लक्षात असेल तर 'थ्री इडियट्स' सिनेमातील हा कॉमेडी सीन आहे..या सिनेमात आमीर खान  बुमन इराणीला 'व्हायरस' हे नाव देतो..बुमन इराणी कॉलेजचे संचालक असतात..आता या सीन बद्दल सांगायचं झालं तर हा तोच सीन आहे जेव्हा राजू (शरमन जोशी) या जगातून व्हायरसला उचलण्याबाबत बोलत आहे..तुम्ही या सीनमध्ये पाहू शकता शरमन जोशी सांगतोय की, देवा मी नॉनवेज खाणं सोडून देईन, हजारो अगरबत्त्या लावेन पण फक्त या व्हायरसला इथून उचलून घेऊन जा..नरकात टाक त्याला, भजी बनव त्याची...या कॉमेडी सीनमुळे अनेकांच्या चेह-यावर हास्य आलं आहे..

Image result for three idiots

जर तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा सोशल मिडियावर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमच्या मित्र-मैत्रीणींना, नातेवाईकांना पाठवून त्यांच्या चेह-यावर हास्य आणू शकता..थोडावेळ का होईना त्यांना या मानसिक ताणातून बाहेर आणत थोडं रिलॅक्स करु शकता..'थ्री इडियट्स' हा सिनेमा आमीर खानच्या सगळ्यात जास्त पसंत केल्या जाणा-.या सिनेमांपैकी एक आहे..

coronavirus aamir khan film 3 idiots scene going viral virus raju rastogi dialogue  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus aamir khan film 3 idiots scene going viral virus raju rastogi dialogue