coronavirus: रणवीर सिंग स्टारर '83' सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोनाचं हे जागतिक संकट लक्षात घेता अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण स्टारर '83' या सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे..

कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे..सरकार या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलंत आहे..देशाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसून येतोय.. त्यातंच सिनेमांचं शूटींग आणि प्रदर्शनावर बंदी आणल्याने अनेक सेलिब्रिटी घरात वेळ घालवत आहेत..

हे ही वाचा: ऋषी कपूर यांना पाकिस्तानी जनतेची काळजी, वाचा काय म्हणाले..

कोरोनाचं हे जागतिक संकट लक्षात घेता अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण स्टारर '83' या सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे..

Image result for ranveer singh in 83

अभिनेता रणवीर सिंग याने या महत्वाच्या अपडेटची घोषणा सोशल साईटवरुन त्याच्या चाहत्यांसाठी केली आहे...रणवीरने सिनेमाच्या निर्मात्यांच एक पत्रक पोस्ट केलंय. यात '83' हा केवळ आमचा सिनेमा नसून संपूर्ण देशाचा सिनेमा आहे. मात्र या सगळ्यापेक्षा देशाची सुरक्षितता सगळ्यात आधी येते.सुरक्षित रहा, काळजी घ्या, आम्ही लवकरंच परत येऊ. असा मेसेज रणवीरने घोषणापत्र पोस्ट करताना खास त्याच्या चाहत्यांसाठी दिलाय..

रणवीर सिंग या सिनेमात विश्वकप विजेता आणि माजी कॅप्टन कपिल देवच्या भूमिकेत तर अभिनेत्री दीपिका पदूकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे..

Image result for ranveer singh in 83

कबीर खान फिल्म प्रोडक्शनचा '83' हा सिनेमा दीपिका पदूकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदूरी, साजिद नाडीयादवाला, फैंटम फिल्म्स, रिलाईंस एंटरटेन्मेंट आणि 83 फिल्म लिमिटेडद्वारे निर्मित आहे..हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलूगू अशा तिनही भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे..

coronavirus ban on release of ranveer singh starrer 83  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus ban on release of ranveer singh starrer 83