corona इफेक्ट: रजनीकांतनंतर मदतीसाठी 'हे' कलाकार आले धावून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

तमिळ आणि हिंदी सिनेमांचे सुपरस्टार रजनीकांत यांनी तमिळ फिल्म इंडस्ट्रीची मातृ संस्था समजल्या जाणा-या फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया (FEFSI) या संस्थेला ५० लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे..

मुंबई- कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहून केवळ हिदी सिनेमा आणि मालिकांच्याच शूटींगला फटका बसलेला नाही तर देशभरातील अनेक भाषांमधील सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीवर या कोरोना व्हायरसचं संकट आहे..तमिळ आणि उतर दाक्षिणात्य भाषेतील सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीची देखील अशीच हालत आहे..

नुकतंच तमिळ आणि हिंदी सिनेमांचे सुपरस्टार रजनीकांत यांनी तमिळ फिल्म इंडस्ट्रीची मातृ संस्था समजल्या जाणा-या फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया (FEFSI) या संस्थेला ५० लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे..

हे ही वाचा: coronavirusच्या संकटात व्हायरल झालेला हा सीन तु्म्हाला हसवून लोटपोट करेल

विशेष म्हणजे चेन्नईतील FEFSI च्या अंतर्गत सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एकूण २३ संस्था संलग्न आहेत..आणि यातील एकुण सदस्यांची संख्या जवळपास ३० हजारच्या घरात आहे..मुख्य म्हणजे यातील हजारच्या आसपास सदस्यांना दिवसावर केलेल्या कामाची कमाई मिळते..असं कळतंय की, रजनीकांत व्यतिरिक्त प्रसिद्ध अभिनेता सूर्याने १० लाख रुपये, विजय सेतुपतिने १० लाख रुपये आणि अनेक सिनेमांच्या निर्मात्यांनी आणि सिने दिग्दर्शकांनी देखील लाखो रुपयांची मदत केली आहे..

Image result for suriya

Image result for south actor vijay and prakash raj donates

यासोबतंच इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी तांदुळाची पोती दानमध्ये दिली आहेत..दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी १२५ तांदळाची पोती (२५ किलो प्रति पोत) FEFSI ला दान दिली आहेत.

Image result for prakash raj

कोरोना व्हायरसचा संसर्ग आता झपाट्याने वाढू लागला आहे. यामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर आत्ताच्या आकडेवारीनुसार ५३६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे..कोरोना व्हायरसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता २१ दिवस संपुर्ण देश लॉकडाऊन केला गेला आहे..  

coronavirus effect after rajinikanth actor vijay and prakash raj also donate

fight with corona  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus effect after rajinikanth actor vijay and prakash raj also donate