'या' दोन प्रसिद्ध मालिकांच्या सेटवर झाला कोरोनाचा संसर्ग.. शूटींगही केलं स्थगित

टीम ई सकाळ
Tuesday, 7 July 2020

शूटींगमध्ये सामिल असलेल्या लोकांना या व्हायरसची लागण झाल्याने दोन मालिकांची शूटींग थांबवण्यात आली आहे. कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समजल्यानंतर दोन मालिकांमधील सगळ्या कलाकार आणि टेक्निशियनची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

मुंबई- महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा हाहाकार माजल्यानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. शूटींगमध्ये सामिल असलेल्या लोकांना या व्हायरसची लागण झाल्याने दोन मालिकांची शूटींग थांबवण्यात आली आहे. कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समजल्यानंतर दोन मालिकांमधील सगळ्या कलाकार आणि टेक्निशियनची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

हे ही वाचा: सरोज खान यांच्या आयुष्यावर येणार जीवनपट? रेमो डिसूझा करणार शेवटची इच्छा पूर्ण?

मिळालेल्या माहितीनुसार, 'मेरे साई' मालिकेच्या शूटिंगच्या सेटवर कोरोना व्हायरसची पहिली केस समोर आली आहे. सेटवरिल एका कर्मचा-याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याने निर्माते नितीन वैद्य यांना फोन केला. या कर्मचा-याने त्याची कोविड-१९ टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. मालिकांची शूटींग आत्ता कुठे सुरु होत असताना मालिकांच्या सेटवर कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्याने इंडस्ट्रीमध्ये अनेकांना धास्ती बसली आहे.

Sony TV show Mere Sai a crew member tests positive for COVID 19 ...

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण १ जुलैचं असून ३ जुलैपासून त्या कर्मचा-याने सेटवर येणं बंद केलं होतं. तेव्हापासून या मालिकेची शूटींग बंद आहे. या मालिकेतील सगळे कलाकार आणि टेक्निशियन क्वारंटाईन आहेत.निर्मात्याने सगळ्यांची कोविड-१९ टेस्ट करुन घेतली आहे. यामध्ये ज्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत त्यांच्यासोबत 'मेरे साई' मालिकेचं शूटींग आज मंगळवार पासून सुरु केलं जाणार आहे.

हे प्रकरण संपत नाही तोवर आणखी एका मालिकेच्या सेटवर कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतंय. 'डॉ. बी.आर. आंबेडकर एक महानायक' या मालिकेतील मुख्य कलाकाराची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. या मालिकेच्या सेटवरही हे कळाल्यानंतर सगळ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या मालिकेची शूटींग गेले दोन दिवस बंद आहे. 

AndTV's Ek Mahanayak Dr BR Ambedkar actor Jagannath Nivangune ...

'बी.आर.आंबेडकर' या मालिकेत बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते जग्गनाथ निवंगुणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. जग्गनाथ हे मराठी कलाकार असून त्यांनी अनेक मालिका आणि  सिनेमांमधून काम केलं आहे. संपूर्ण काळजी घेऊनही सेटवर कोरोनाचा शिरकाव झाल्याने सगळेजण काळजीत आहेत.

जग्गनाथ सध्या वरळी येथे उपचार घेत असून ते सुखरुप आहेत. ते क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. त्यांना झालेल्या कोरोनामध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांना कसलाही त्रास होत नसून काळजीचं कारण नसल्याचं कळतंय. या मालिकेच्या सेटवर ४० जण असतात. त्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.    

coronavirus outbreak mere sai and dr br ambedkar serial shooting stalled after crew member tests positive of covid 19  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus outbreak mere sai and dr br ambedkar serial shooting stalled after crew member tests positive of covid 19