coronavirus: शाहरुख खान म्हणतो येणा-या १०-१५ दिवसात करावा लागू शकतो कठीण परिस्थितीचा सामना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

बॉलीवूडच्या दिग्गजांनी आपापल्या परिने आवाहन केल्यानंतर आता या साखळीत किंग खान शाहरुख खानचा देखील समावेश झालाय.. अभिनेता शाहरुख खानने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे..त्याने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय..आणि त्यातून लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय..

सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आलंय..चीनमधील वुहान इथून पसरलेला हा व्हायरस संपूर्ण जगात दिवसेंदिवस पसरत चाललेला आहे..कोरोना व्हायरस भारतात पसरल्यापासून बॉलीवूडची मंडळी त्यापासून जागरुक राहण्यासाठी अनेक प्रकारे आवाहन करत आहेत..बॉलीवूडच्या दिग्गजांनी आपापल्या परिने आवाहन केल्यानंतर आता या साखळीत किंग खान शाहरुख खानचा देखील समावेश झालाय.. अभिनेता शाहरुख खानने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे..त्याने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय..आणि त्यातून लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Let’s get together and fight this #WarAgainstVirus. @cmomaharashtra_ @adityathackeray

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक आवाहन करत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गर्दीची ठिकाणांपासून लांब राहण्याचा, टाळण्याचा संदेश दिलाय..तो म्हणतो, 'जेवढं कमी होऊ शकेल तेवढं कमी तुम्ही घराबाहेर पडा..' शाहरुखने लोकांना ट्रेन आणि बस या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या प्रवासापासून सांभाळून रहा असं सांगितलंय..त्याचं म्हणणं आहे की, 'राज्य सरकारने या जागतिक संकटाबाबत सुरक्षेच्या बाबतीत जो काही निर्णय दिला त्याचं पालन सर्वांनी जरुर करा..येणा-या १० ते १५ दिवसात कदाचित खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो..'

HBD राणी मुखर्जी: 'या' अभिनेत्रीने नाकारलेल्या भूमिकेमुळे राणी रातोरात बनली बॉलीवूडची स्टार

शाहरुख त्याच्या या व्हिडिओमधून लोकांना कोरोनाच्या बाबतीत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं सांगतोय..त्यासोबतंच कठीण परिस्थितीत नागरिक आणि सरकार या दोघांनी हातात हात घालून एकमेकांच्या सोबतीने काम करणं आवश्यक आहे...व्हिडिओच्या शेवटी शाहरुख सांगतोय, 'कोरोनाच्या संसर्गामुळे घाबरुन जाऊ नका.राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व निर्णयांचं आणि आदेशांच जरुर पालन करा' असा सल्ला त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय..

नुकतंच १९ मार्चला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटावर एक महत्वपूर्ण संदेश दिलाय..त्यात त्यांनी रविवार २२ मार्चला देशातील नागरिकांनी संपूर्ण दिवसभर घराच्या बाहेर पडू नका असं सांगत 'जनता कर्फ्यू' घोषित केला आहे..शाहरुख खानने पंतप्रधानांच्या या निर्णयाचं समर्थन देखील केलं आहे..शाहरुखने पंतप्रधानांचा हा निर्णय देशासाठी आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचा असल्याचं सांगत या निर्णयाचं स्वागत केलंय..

Image result for shahrukh khan narendra modi

जगभरासोबतंच भारतात पसरत चाललेल्या या कोरोना व्हायरसमुळे नागरिक घाबरले आहेत..भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक राज्यातील शाळा, कॉलेज, चित्रपटगृह, मॉल बंद ठेवण्यात आलेले आहेत..सरकार याबाबत दिवसरात्र जागरुकता निर्माण करताना दिसतेय...जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून वाचण्याासठी सेफ हँड्स चॅलेंज अभियान राबवलं आहे..तर दुसरीकडे मुंबई टेलिव्हिजनसोबतंच सिनेमांचं शूटींगही थांबवण्यात आलंय...यामुळे अनेक कलाकार स्वतःला घरीच आयसोलेशनमध्ये ठेवणं पसंत करत आहेत...

coronavirus shahrukh khan made people aware 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus shahrukh khan made people aware