esakal | गंगूबाई काठियावाडीला कोर्टाचा दिलासा, 'द माफिया क्वीन्स ऑफ मुंबईचा वाद'
sakal

बोलून बातमी शोधा

gangubai kathiyawadi

गंगूबाई काठियावाडीला कोर्टाचा दिलासा

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेत्री आलिया भटच्या आगामी गंगूबाई काठियावाडी सिनेमासंबंधीत पुस्तकाच्या लेखकांविरोधात सुरु केलेल्या खटल्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम स्थगिती दिली. द माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकांचे लेखक हुसेन झैदी आणि जेन बोर्गेस यांच्या विरोधात बाबुजी शहा यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. शहा हे गंगुबाईचे कथित दत्तक पुत्र आहेत. या पुस्तकावर गंगुबाई काठियावाडीची कथा आधारित असून निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ती साकारली आहे. अभिनेत्री आलिया यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. गंगुबाई कामाठिपुरामध्ये काम करणारी प्रभावशाली महिला होती.

या पुस्तकात गंगुबाई यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे, पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी त्याची माहिती देण्यात आली नाही आणि तपशीलाची शहनिशा केली नाही. त्यामुळे गंगुबाई आणि त्यांच्या परिवाराची बदनामी झाली असून त्यांचा खासगी आयुष्य जगण्याच्या अधिकारांवर बाधा आली आहे, असे शहा यांनी तक्रारी मध्ये म्हटले आहे. दंडाधिकारी न्यायालयाने याबाबत दोन्ही लेखकांना समन्स बजावले आहे. ही कारवाई रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्या रेवती मोहिते-डेरे यांच्या पुढे यावर सुनावणी झाली. पुस्तक एप्रिल 2011 मध्ये प्रकाशित झाले आणि त्यावर आता आक्षेप घेतला आहे, तसेच सत्र न्यायालयाने यापूर्वी अशीच एक तक्रार रद्द केली आहे, असे झैदी यांच्या वतीने एड गुंजन मंगला यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तूर्तास दंडाधिकारी कारवाईला अंतरिम स्थगिती दिली असून 7 सप्टेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: गंगुबाई काठियावाडींच्या मुलाचाच चित्रपटाला विरोध; आलिया भट्ट, भन्साळींना कोर्टाने बजावले समन्स

हेही वाचा: 'गंगुबाई काठियावाडी'ओटीटीवर नाहीच, थिएटरमध्येच होणार प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी गंगुबाई काठियावाडीचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यात गंगुबाईची भूमिका आलिया भट्टनं साकारली आहे. त्यासाठी तिनं बरीच मेहनत घेतली आहे. त्याबाबत तिनं काही मुलाखतींतून ही गोष्ट सांगितली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर गंगुबाई काठियावाडीविषयी वादाला सुरुवात झाली. तो वाद न्यायालयापर्यत गेला आहे. येत्या काही दिवसांत हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचीही चर्चा आहे. त्याचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे.

loading image
go to top