केआरकेचं नवीन युट्युब चॅनेल, मीका आणि विंदूला शिवीगाळ

मात्र आता ते चॅनल त्यानं नव्यानं सुरु केलं आहे. आणि त्यावर त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
actor kamal khan
actor kamal khan Team esakal

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग (mika singh) आणि कमाल खान (kamal khan) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मिकानं केआरकेवर एक गाणं तयार केलं होतं. त्याला प्रतिक्रिया म्हणून केआरकेनं त्याला ते गाणं प्रसिद्ध केलं तर माझ्याशी गाठ आहे. हिंमत असेल तर ते गाणं रिलिज करुन दाखव. अशा शब्दांत उत्तर दिले होते. सलमान खानवर (salman khan) टीका केल्यानंतर कमाल खान चर्चेत आला होता. त्यावर त्याला कोर्टानं फटकारलही होतं. मात्र त्याचा काही एक परिणाम कमाल खानवर झाला नाही. (court rebuke krk opened new youtube channel abused mika and bindu dara singh)

वास्तविक कमाल खानचं युट्युब चॅनल (kamal khan youtube channel) बंद करण्यात आले होते. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. मात्र आता ते चॅनल त्यानं नव्यानं सुरु केलं आहे. आणि त्यावर त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. काही दिवसांपासून कमाल राशिद खान हा सलमानवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आला होता. त्यानं त्याच्या राधे सिनेमावर एक रिव्ह्यु केला होता. त्यात त्यानं त्या चित्रपटावर सडकून टीका केली होती. आणि ती सलमानच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे त्यानं केआरकेच्या विरोधात कोर्टात धावही घेतली होती. सलमाननं मानहानीचा दावा दाखल केला होता. दुसरीकडे कमाल आणि मिका सिंग यांच्यात वाद सुरु झाला आहे.

कमाल खानच्या युट्युब चॅनलवर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानं एक नवीन चॅनल सुरु केलं आहे. त्याच्यामाध्यमातून त्यानं मिका सिंग आणि विंदू दारा सिंग यांना शिवीगाळ केली आहे. मिका सिंग कमाल खानवर केआरके कुत्ता नावाचे गाणे तयार केले होते. आणि त्याच्या चॅनलवर हे गाणं रिलिज केलं होतं. यावर केआरकेनं आपल्या चॅनेलवर मिका सिंगवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

actor kamal khan
राखी सावंतकडून चुकून 'खतरों के खिलाडी 11'च्या विजेत्याचं नाव जाहीर

केआरकेनं युट्युबवर देखील पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. त्यानं लिहिल आहे, मी आता नवीन चॅनेल सुरु केलं आहे. त्यावर धमाल होणार आहे. यापुढे मिका आणि विंदू दारासिंग यांच्यावर परखड शब्दांत टीका केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com