कंगनाला कोर्टाचा दणका, अख्तर यांच्याविरोधात केली होती याचिका

बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतला (Bollywood Actress kangana ranaut) आता सत्र न्यायालयानं दणका दिला आहे.
Kangana Ranaut, Jawed AKhtar
Kangana Ranaut, Jawed AKhtarGoogle

Entertainment News: बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतला (Bollywood Actress kangana ranaut) आता सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. कंगनानं प्रसिद्ध (Bollywood Actress) गीतकार जावेद अख्तर (Javed akhtar) यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. ती याचिका दुसऱ्या कोर्टामध्ये वर्ग घेण्यासाठी (Bollywood News) कंगनानं सत्र न्यायालयाकडे मागणी केली होती. मात्र त्या याचिकेला कोर्टानं रद्द ठरवलं आहे. त्यामुळे येत्या काळात कंगनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी कंगनानं ज्या कोर्टामध्ये सुनावणी सुरु होती त्या कोर्टाबद्दल अवमानजनक टिप्पणी केली होती. त्याचा तिला फटका बसल्याचे बोलले जात आहे.

जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मुंबईतील सत्र न्यायालयामध्ये बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे कंगनाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कंगना आणि अख्तर यांच्यातील वाद हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला होता. त्यांच्यातील वाद बॉलीवू़ड सेलिब्रेटींना देखील प्रतिक्रिया देण्यास भाग पाडणारा होता. कंगनानं अख्तर यांच्याविषयी अपमानकारक शब्दांचा वापर केल्याचे अख्तर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते. दुसरीकडे कंगनानं देखील अख्तर यांच्याविरोधात मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले होते.

Kangana Ranaut, Jawed AKhtar
Photo Viral: दिया मिर्झा पहिल्यांदाच दिसली छोट्या 'अव्यान' सोबत

कंगनानं पूर्वीच्या कोर्टावरच काही आरोप केले होते. तिनं म्हटलं होतं की, अंधेरी कोर्टामध्ये मला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे माझी निराशा झाली. याकारणास्तव मला दुसऱ्या कोर्टामध्ये जाण्याची गरज वाटली. म्हणून मी ही याचिका दुसऱ्या कोर्टामध्ये वर्ग करावी. अशी मागणी कोर्टाकडे केली होती. यापूर्वी सत्र न्यायालयानं कंगनान दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कंगनाच्या याचिकेला असंबंधित असे म्हटले होते.

Kangana Ranaut, Jawed AKhtar
Pavankhind Movie Video Viral : चिन्मय मांडलेकर यांचा सिनेमागृहातील व्हिडिओ व्हायरल | Sakal Media

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com