भारती सिंग आणि नवरा हर्षला कोर्टाचा मोठा दिलासा ! फेटाळली NCB ची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court rejects NCB’s plea challenging bail granted to Bharti Singh, husband harsh limbachiya

Bharti Singh Husband: भारती सिंग आणि नवरा हर्षला कोर्टाचा मोठा दिलासा ! फेटाळली NCB ची मागणी

Bharti Singh - Harsh Limbachiya News: कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. NCB ने भारती - हर्षला मिळालेला जामीन रद्द करण्याची याचिका NCB ने केली होती.

परंतु या दोघांनी जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले नाही या कारणाने विशेष NDPS न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करण्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची याचिका फेटाळली.

भारती - हर्षच्या घरी आणि कार्यालयात गांजा सापडल्यानंतर या जोडप्याला नोव्हेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती.

NCB ने युक्तिवाद केला की त्याच्या वकिलाचे ऐकल्याशिवाय जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु न्यायालयाने सांगितले की सुनावणीला उपस्थित न राहणे ही एजन्सीची चूक आहे आणि जामीन रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही.

विशेष एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट) न्यायालयाने गेल्या आठवड्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ची याचिका फेटाळून लावली, ज्यामध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना देण्यात आलेला जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

NCB ने 21 नोव्हेंबर 2020 रोजी भारती सिंग आणि तिच्या पतीच्या निवासस्थानी आणि उत्पादन गृहावर छापे मारताना 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी अटक केली होती.

23 नोव्हेंबर रोजी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. NCB ने 31 डिसेंबर रोजी जामिनाला आव्हान देणारी याचिका विशेष NDPS कोर्टात दाखल केली होती.

विशेष न्यायालयाने म्हटले आहे की, 22 नोव्हेंबर 2020 रोजी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी NCB ला बोलावण्यात आले होते, परंतु एजन्सीच्या वतीने कोणीही हजर झाले नाही

आणि 23 नोव्हेंबर रोजी न्यायालयात फिर्यादी किंवा तपास अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे एजन्सीची चुक असल्याने भारती आणि हर्षचा जामिन नामंजुर करण्याचा कोणतेही कारण नाही असं सांगण्यात आले.