अभिनेत्री मलाईका अरोरा म्हणते 'कोरोनामुळे जवानी निघून जायची वेळ आली..'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 14 September 2020

मलाईका अरोराने काही दिवसांपूर्वीच ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं सोशल मिडियावरुन सांगितलं होतं. अशांतच मलाईका अरोराने एक पोस्ट केली आहे जी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि फिटनेस फ्रिक मलाईका अरोराने काही दिवसांपूर्वीच ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं सोशल मिडियावरुन सांगितलं होतं. मी कोरोना पॉझिटीव्ह आहे आणि यामुळे सेल्फ क्वारंटाईन आहे असं तिने म्हटलं होतं.आता अशांतच मलाईका अरोराने एक पोस्ट केली आहे जी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.   

हे ही वाचा: दीपिकानंतर आता रणवीर सिंह सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटींगवर परतला  

नुकतंच मलाईका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलंय, 'कोणी तरी कोरोनाची लस बनवा बाबा, नाहीतर ही जवानी अशीच निघून जाईल.' मलाईकाच्या या पोस्टवरुन असा अंदाज लावला जातोय की मलाईका सेल्फ आयसोलेशनमध्ये चांगलीच वैतागली आहे. मात्र तिचा हा कॉमेडी अंदाज सगळ्यांनाच पसंत पडलाय. 

malaika

अभिनेत्री मलाईका अरोराच्याआधी  अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली होती. अर्जुनने देखील त्याच्या सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं, 'मी व्यवस्थित आहे. काही सौम्य लक्षणं आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यावरुन मी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतलं आहे. मला पाठिंबा देण्यासाठी मी आधीच तुम्हाला धन्यवाद देतो. मी माझ्या आरोग्यासंबंधीचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करेन. मला पूर्ण विश्वास आहे की आपण या कोरोना व्हायरविरुद्ध जिंकू.'

अर्जुन कपूर आणि मलाईकाच्या अफेअरची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. अनेकदा दोघं एकमेकांसोबत दिसून आले होते. सोशल मिडियावर दोघांचे वॅकेशनचे फोटो देखील आहेत. अर्जुननंतर काही वेळाने मलाईकाने देखील ती पॉझिटीव्ह असल्याचं सांगताच चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली.   

covid 19 positive actress malaika arora says koi vaccine bana do bhai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 positive actress malaika arora says koi vaccine bana do bhai