अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये टुथब्रशने शूज साफ करताना दिसला विराट कोहली

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 12 November 2020

कोहलीसोबतंच संपूर्ण टीम ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.  याआधी भारताचा कॅप्टन विराट कोहली दौ-यासाठी खास तयारी करताना दिसला.

मुंबई- आयपीएलमध्ये भलेही विराट कोहलीची टीम आरसीबीचा प्रवास प्लेऑफमध्ये संपला असला तरी भारताचा कॅप्टन विराट कोहली  त्याची दुसरी जबाबदारी निभावण्याच्या तयारीला लागला आहे. कोहलीसोबतंच संपूर्ण टीम ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.  याआधी भारताचा कॅप्टन विराट कोहली दौ-यासाठी खास तयारी करताना दिसला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने याचीच एक झलक दाखवली आहे. 

हे ही वाचा: तमन्नाने सांगितला कोरोनाचा अनुभव, ‘त्या वेळी होती मृत्यूची भीती’   

अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहली बाथरुममध्ये आहे. विराटच्या हातात टुथ ब्रश दिसून येतोय. या टुथ ब्रशने तो त्याच्या शूजची साफसफाई करताना दिसतोय. हा फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शन देत लिहिलंय, दौ-यावर जाण्याआधी पतीला त्याचे स्पाईक्स साफ करताना पकडलं. या फोटोमध्ये कोहलीचं लक्ष कॅमेराकडे जरापण नाहीये. तो पूर्ण मग्न होऊन त्याचे शूज साफ करताना दिसतोय.

Virat

विराटचा हा फोटो चाहत्यांना मजेशीर वाटत असून त्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत.विराट कोहली भलेही आता ऑस्ट्रेलियाला जात आहे मात्र तो दौ-याच्या मध्यात भारतात परत येईल. बीसीसीआयने विराटला पॅटरनिटी लीव देण्याचा निर्णय घेतला आहे.   

cricket anushka sharma shared virat kohli unseen picture of cleaning his spikes shoes 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket anushka sharma shared virat kohli unseen picture of cleaning his spikes shoes