Ghar Banduk Biryani: पुण्यात नागराज मंजुळेना पाहण्यासाठी फॅन्सची तोबा गर्दी, व्हिडीओ एकदा बघाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagraj manjule, akash thosar, sayli patil, sayaji shinde, Ghar Banduk Biryani, Ghar Banduk Biryani news, Ghar Banduk Biryani full movie, Ghar Banduk Biryani showtiming

Ghar Banduk Biryani: पुण्यात नागराज मंजुळेना पाहण्यासाठी फॅन्सची तोबा गर्दी, व्हिडीओ एकदा बघाच

Nagraj Manjule News: सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'घर बंदूक बिरयानी'. आकाश ठोसर , सयाजी शिंदे, नागराज मंजुळे या तिघांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.

याशिवाय भावना भाभी फेम सायली पाटील सुद्धा सिनेमात आकाशची हिरोईन म्हणून झळकत आहे. सिनेमात अनेक कलाकार असले तरीही खरी हवा आहे ते नागराज मंजुळेंची. या गोष्टीचा नुकताच अनुभव आला.

(crowd of fans excited to watch Nagraj Manjule in Pune video viral ghar banduk biryani movie pramotion)

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

नागराज मंजुळे नुकतेच हडपसर येथील सिझन मॉल मध्ये घर बंदूक बिरयानी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. त्यावेळी नागराज मंजुळे यांना पाहण्यासाठी सिझन मॉल असलेल्या पब्लिकने आणि स्टाफने तोबा गर्दी केली.

नागराज यांनी सर्वांना हात मिळवत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी आकाश ठोसर आणि सायली सुद्धा उपस्थित होते. पण जास्त हवा नागराज यांचीच दिसली.

मुळात नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे चौकटीबाहेरचा चित्रपट, हे आता समीकरणच बनले आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली असून ते एका तडफदार, प्रामाणिक पोलीस अधिकाराच्या भूमिकेत झळकत आहेत.

त्यांचा हा 'ॲक्शन हिरो'चा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' ही त्याला अपवाद नाही. या चित्रपटात पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत आहे. हे डाकू हुबेहूब दिसावेत, यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार ज्याप्रमाणे त्यांनी वेचले.

त्याप्रमाणेच पोलीसही खरे वाटावेत, म्हणून त्यांनी काही रिअल पोलिसांनाच अभिनयाची संधी दिली. यात कोणी त्यांचा भाऊ आहे, कोणी मित्र आहेत. त्यामुळे आता इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिअॅलिस्टिक असणार, हे नक्की!

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून

यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.