
तुम्ही जर घरात असाल तर मग तुमच्या चर्चेमध्ये कोणी ना कोणी हे येणारंच आणि सध्या सेलिब्रिटींच्या बाबतीतही असंच काहीसं होताना पाहायला मिळतंय..नवाब सैफ अली खान याबाबतीलं एक नवीन उदाहरण म्हणता येईल..
मुंबई- कोरोना व्हायरच्या महारोगराईमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे.. बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीची सगळी कामं बंद आहेत. सगळे सेलिब्रिटी घरात बसून आहेत. यादरम्यान हे सेलिब्रिटी जास्तीत जास्त सोशल मिडियावर लाईव्ह चर्चा करत आहेत आणि मुलाखत देत आहेत. आता तुम्ही जर घरात असाल तर मग तुमच्या चर्चेमध्ये कोणी ना कोणी हे येणारंच आणि सध्या सेलिब्रिटींच्या बाबतीतही असंच काहीसं होताना पाहायला मिळतंय..नवाब सैफ अली खान याबाबतीलं एक नवीन उदाहरण म्हणता येईल..
हे ही वाचा: कनिका कपूरचा खुलासा.. कोरोना पॉझिटीव्ह होण्याआधी नेमकं कुठे आणि काय घडसं होतं?
त्याचं झालं असं की अभिनेता सैफ अली खान एका लाईव्ह व्हिडिओवर चॅट करत होता आणि मग अचानक छोटा नवाब तैमुर अली खान त्याच्या फोटोवर कमेंट करायला लागतो..यावेळी सैफची रिऍक्शन बघण्यासारखी होती. सैफ मुलगा तैमुरच्या बोलण्याने एवढा कन्फ्युज झाला की त्याची ही रिऍक्शन पाहून लोकांना हसू आवरलं नाही..
छोटा नवाब तैमुर त्याच्या या मस्ती मुडमध्ये खुपंच क्युट दिसतोय. तैमुर सैफला मध्येच येऊन प्रश्न विचारतो की, या फोटोमध्ये काय सुरु आहे? सैफ त्याच्या या प्रश्नाने कन्फ्युज होतो आणि उलट त्यालाच विचारतो कोणता फोटो? तेव्हा तैमुर त्याच्या लाईव्ह व्हिडिओकडे बोट दाखवत म्हणतो हा फोटो आणि मग बोलता बोलताच निघुन जातो. यामुळे सैफअली खान आणखी कोड्यात पडतो. हा व्हिडिओ सैफअली खानच्या फॅनपेजवरुन व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे घरी असलेले सेलिब्रिटी सोशल मिडियावर जास्त ऍक्टीव्ह आहेत. काही सेलिब्रिटी चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.. यादरम्यान सेलिब्रिटी घरातंच एकमेकांच्या व्हिडिओमध्ये बॉम्ब करताना दिसून येतात.
नुकतंच काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये पत्नी अनुष्का शर्माने लाईट लावून प्रेक्षकांना खुष केलं होतं..तर दुसरीकडे सलमान खान आणि युलिया वंतूर एकत्र राहत असल्याचं एका व्हिडिओमधून समोर आलं होतं..युलिया तिच्या चॅट शोमध्ये लाईव्ह होती तेव्हा सलमान खान तिच्या व्हिडिओमध्ये येऊन कॉम्प्युटरमध्ये डोकावतो..युलिया त्याच्या अचानक येण्याने खूपंच लाजली होती..त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटींसोबत चांगलीच मजा मस्ती होताना दिसतेय.
cute timur came amidst live chat of saif ali khan know how the actors reaction was