तौक्ते वादळाचा बॉलिवूडला फटका; कलाकरांचे मोठे नुकसान

मुंबईमधील किनारपट्टी लगतच्या भागात तैक्ते वादळाचा तडाका बसला.
cyclone tauktae Storm hits mumbai Big loss of bollywood actors ranbir kapoor amitabh bachchan
cyclone tauktae Storm hits mumbai Big loss of bollywood actors ranbir kapoor amitabh bachchan esakal

अतितीव्र स्वरूप धारण केलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारट्टीला मोठा फटका बसला आहे. काहींच्या घरावरचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी गाड्यांवर झाड पडले. तौक्ते वादळ आता बॉलिवूड कलाकरांसाठीही नुकसान पोहोचवणारे ठरले आहे. मुंबईमधील किनारपट्टी लगतच्या भागात तैक्ते वादळाचा तडाका बसला. बॉलिवूडचा प्रसिद्ध कलाकार रणबीर कपूरच्या मुंबईमधील घराचे बांधकाम सध्या सुरू आहे. सोमवारी तैक्ते वादळ मुंबईमध्ये दाखल झाल्याने रणबीरच्या घराचे नुकसान झाले आहे.

मुंबईमधील वांद्रे येथे रणबीच्या नव्या घराचे बांधकाम सुरू आहे. तौक्ते वादळामुळे तेथे झालेल्या नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. रणबीर सोबतच एकता कपूर आणि जितेंद्र कपूर यांच्या जुहूच्या घराजवळच्या रस्त्याचे देखील नुकसान झाले आहे. सोमवारी (ता.17) रात्री अमिताभ बच्चन यांच्या 'जनक' नावाच्या ऑफिसमध्ये तौक्ते वादळामुळे झालेल्या पावसाचे पाणी साठले. याबद्दल आमिताभ यांनी लोकांना माहिती दिली, 'दिवसभर जोरदार पाऊस सुरु होता. झाडे पडली अनेकांचे नुकसान झाले. माझ्या जनक या ऑफिसमध्ये देखील पाणी शिरले आहे.'

cyclone tauktae Storm hits mumbai Big loss of bollywood actors ranbir kapoor amitabh bachchan
लग्नाच्या १७ वर्षांनंतर 'CID' फेम हृषिकेशचा घटस्फोट; म्हणाला, 'इतकी वर्षे गप्प होतो कारण..'

तैक्ते चक्रीवादळ सोमवारी दुपारी मुंबईमध्ये दाखल झाले. या चक्रिवादळामुळे 26 अपघात झाले अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. तसेच शहरात एकूण 17 शॉर्ट सरकीट झाले असून तौक्तेमुळे एकूण 479 झाडे पडली. या चक्रिवादळामुळे मुंबईमध्ये अनेक घरांचे आणि गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मुंबईमध्ये आंतराष्ट्रीय विमान वाहतूक 11 तास बंद होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com