दबंग थ्रीमधलं नवं गाणंं; सलमान-सोनक्षीच्या युनिक डान्स स्टेप्स पाहाच

Dubbang 3 new song out !
Dubbang 3 new song out !

मुंबई : बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणजेच सलमानी पसंती सर्वाधीक आहे. चाहत्यांपासून सर्व स्टारसपर्यंत सलमानची फॅन फोलोइंगही जास्त आहे. हेच समिकरण त्याच्या चित्रपटाच्या बाबतीतही आहेच. सलमान वर्षातून मोजकेच सिनेमे करतो पण ते जबरदस्त असतात. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे दबंगच्या सिक्वेलचा तीसरा भाग येतोय. 'दबंग 3' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली आहे. चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरु असतानाच सिनेमांच आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'यूं करके' असं या गाण्याचं नाव असून यामध्ये सोनाक्षी सिन्हा आणि सलमान दिसत आहे. या गाण्यामध्ये सोनाक्षी आणि सलमान यांचा नौटी अंदाज पाहायला मिळतोय. या दोघांमध्ये मजेशीर केमिस्ट्री पाहायला मिळतेय. दबंगमध्ये सलमानच्या डान्सचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. चुलबुल पांडेच्या भूमिकेतला त्याच डान्स प्रेक्षकांना खूपल आवडला. आता या नव्या गाण्यातही  सलमानने अनोखा डान्स केला आहे.

सलमानने हे गाणं शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'ये करो, वो करो, सब करो, जो चाहे वो करो लेकिन करो यूं करके.' या गाण्यामुळे चाहत्य़ांचा विकेंड नक्कीच स्पेशल ठरला असणार आहे. रज्जो आणि चुलबुलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना आवडतेय. हे गाणं रिलिज झाल्यापासून काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

वैभवी मर्चंटने या गाण्याची उत्तम कोरिओग्राफी केली आहे. अरबाज खान आणि निखिल द्विवेदी यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे तर, डान्स मास्टर प्रभूदेवा दिग्दर्शन करतो आहे. सलमानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सलमानसोबत या चित्रपटातून झळकणार आहे. सलमान आणि सई मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहेत. सलमानचा दबंग 3 पुढच्या महिन्यात 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com