Dabangg 3 : पुन्हा एकदा चुलबुल पांडेची हवा, नव्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल !

dabangg 3 new song released
dabangg 3 new song released

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर जलवा करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'दबंग 3' ची चर्चा सर्वत्र पाहायला मिळतेय. दबंग चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. शिवाय चित्रपटाचं प्रमोशनही जोरदार सुरु आहे. त्यातच आता या सिनेमाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे ज्यामध्ये नेहमीप्रमाणेच सलमानचा अनोखा 'स्वॅग' दिसत आहे. 

त्याचं 'हुड हुड दबंग' हे गाणं प्रेक्षकांच्या मनात आणि तोंडावर कायम आहे. दबंग 3 चित्रपटाचं नवं 'हुड हुड' हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. सलमानचा एक वेगळाच अंदाज यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे चाहत्यांनी या गाण्याला भरपूर पसंती दिली आहे. त्याचमुळे हे गाणं सध्या इंटरनेटवरही चांगलचं व्हायरल होताना दिसत आहे. 

युट्युबवर या गाण्याला 10 मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत. एवढचं काय सलमान या गाण्यामध्ये चक्क तोंडातून आग बाहेर काढताना दिसतो. सलमानचा हाच 'स्वॅग' लोकांना आवडला आहे आणि त्याच्या या अॅक्शनमुळे गाण्याला प्रेक्षकांना भरभरुन प्रेम दिलं आहे. 

अरबाज खान आणि निखिल द्विवेदी यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे तर, डान्स मास्टर प्रभूदेवा दिग्दर्शन करतो आहे. सलमानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सलमानसोबत या चित्रपटातून झळकणार आहे. सलमान आणि सई मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहेत. सलमानचा दबंग 3 पुढच्या महिन्यात 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक साजिद-वाजिद यांनी हे गाणं लिहिलं आहे.तर, शबीना खान हिने गाणं कोरिओग्राफ केलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com