Video : सपना चौधरीचा डान्सचा नाही, तर 'हा' व्हिडिओ व्हायरल...

Dancer Sapna Chaudhary workout video gets viral
Dancer Sapna Chaudhary workout video gets viral

सपना चौधरी नेहमीच तिच्या हटके डान्समुळे चर्चेत असते. कायम कुठे ना कुठे एखाद्या गाण्यावर सहजपणे डान्स करणाऱ्या सपनाचे प्रचंड प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतात. आपल्या डान्सने तिने अनेक चाहत्यांना घायाळ केलंय... याही वेळी तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पण यावेळी हा व्हिडिओ डान्सचा नाही बरं का... मग कसला व्हिडिओ आहे हा?

सपना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. फोटो आणि व्हिडिओजने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट भरले आहे. नुकताच तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय, पण यावेळी तो डान्सचा नाही... तर हा व्हिडिओ आहे तिच्या वर्कआऊटचा! सपना यावेळी जीममध्ये व्यायाम करतीय. विविध प्रकारचे व्यायाम ती रोज करते आणि म्हणूनच ती आज फीट आहे. तिने या व्हिडिओला 'राम राम इंडिया, मैं सूपर woman नहीं हूँ, खाने से बहुत प्यार करती हूँ। इसलिए workout से भी उतना ही करना पड़ता है। अपनी Gym stories Share karo, tag करो मुझे और @famefoxbyfmg #famefoxbyfmg को !! हम फ़िट तो इंडिया फ़िट!' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमार्फत तिने सर्वांना व्यायाम करण्याचे आव्हान दिल आहे. 

हरियाणी डान्सर सपना नेहमीच काही ना काही व्हिडिओ शेअर करून मनोरंजन करत असते. पण या व्हिडिओवरून कळतंय की डान्स इतकंच व्यायामालाही ती महत्त्व देते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com